Vitamin Deficiency Cause Dark Skin : कोणत्या विटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचा काळी पडते?

या विटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग काळा पडू लागतो आणि बऱ्याच काळासाठी या काळ्या खुणा तुमच्या शरीरावर राहतात. या विटॅमिनबद्दल जाणून घेऊया.

Vitamin Deficiency Cause Dark Skin: सर्वांनाच आपल्या त्वचेजी खूप काळजी असते. सुंदर दिसण्यासाठी आपण कित्येक सौंदर्य प्रसाधने वापरत असतो. मात्र तुम्हाला अशा एका विटॅमिनबद्दल सांगणार आहोत, जे डाएटमध्ये सामील न केल्याने तुमचं खूप नुकसान होऊ शकतं. या विटॅमिनच्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग काळा पडू लागतो आणि बऱ्याच काळासाठी या काळ्या खुणा तुमच्या शरीरावर राहतात. या विटॅमिनबद्दल जाणून घेऊया.

विटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे त्वचा काळी पडू शकते. (Vitamin B12 Deficiency Cause Dark Skin)

आपण ज्या विटॅमिनबद्दल बोलत आहोत, त्याचं नाव विटॅमिन बी१२ आहे. याच्या कमतरतेमुळे त्वचेवर काळे डाग आणि सुरकूत्या येऊ लागतात. आणि वेळेनुसार, त्वचेचा रंग काळा पडतो. विटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे काळ्या व्यक्तींची त्वता अधिक काळी पडते. अधिकतर या व्यक्तींचे हात, पाय, बोटं, हात आणि पायावरील त्वचा काळी पडू लागते.

विटॅमिन B12 च्या कमतरतेमुळे त्वचेचा रंग काळा का पडतो? याबाबतच नेमकं कारण नाही. मात्र’हाइपरपिग्मेंटेशन’ मुळे असं होत असल्याचं सांगितलं जातं.

विटामिन B12 ची कमतरता कशी होते ( Vitamin B12 Kami ka hota?)

विटामिन B12 ची कमतरता मांस, मासे, अंडी आणि फोर्टिफाइड फूड ( उदा- गव्हाचं पीठ, तांदूळ, मीठ, तेल आणि दूध) याचं पुरेसं सेवन न केल्याने विटॅमिन बी१२ ची कमतरता होऊ शकते.

विटॅमिन B12 ची कमी कशी दूर कराल (How to overcome vitamin B12 deficiency)
विटॅमिन B12 ची कमतरता दूर करण्यासाठी मांस, मासे, अंडी आणि डेअरी प्रोडक्ट आदी पदार्थ सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. या सोबतच धान्य आणि फोर्टिफाइड फूडचं सेवन करा.


About Author

Smita Gangurde

Other Latest News