Dr. Babasaheb Ambedkar Jayanti: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना करा अभिवादन, द्या सुंदर शुभेच्छा

Aiman Jahangir Desai
Dr. Babasaheb Ambedkar Jayanti Marathi Wishes:  भारतात दरवर्षी 14 एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली जाते. भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. भीमराव आंबेडकर यांची ही जयंती आहे. हा दिवस केवळ त्यांच्या जीवनाचे आणि संघर्षांचे स्मरण करण्याची संधी नाही तर न्याय, सामाजिक समानता आणि मानवी हक्कांप्रती त्यांची वचनबद्धता देखील आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे एक महान समाजसुधारक, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, कायदेतज्ज्ञ आणि भारतीय इतिहासातील सर्वात प्रभावशाली व्यक्तिमत्त्वांपैकी एक होते. आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण आपल्या प्रियजनांना शुभेच्छा देण्यासाठी हे संदेश शेअर करू शकता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मराठी शुभेच्छा-

ज्यांच्यामुळे लाखों घरांचा उद्धार झाला,
दीन दुबळ्यांना जगण्याचा अधिकार मिळाला…
कोटी कोटी अभिवादन त्या महामानवाला
ज्यांनी संविधान रूपी समतेचा अधिकार दिला.
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

मान वर करून जगायला शिकवलं माझ्या भीमाने,
शिक्षणाचे महत्व समजावले माझ्या भीमाने,
अन्यायाविरुध्द लढायला शिकवले ज्याने,
माझे शत शत नमन चरणी त्यांचे…
डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

मोजू तरी कशी उंची तुझ्या कर्तृत्वाची तू
जगाला शिकवली व्याख्या माणसाला माणुसकीची..!
भीम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार
ते शिक्षणाचा प्रसार करणारे ज्ञान देवता
ते दीन-दुबळयांच्या हाकेस धावून जाणारे
महापुरुष ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर
जयंती निमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन !

विश्वरत्न, विश्वभुषन, भारतरत्न,
महाविद्वान, महानायक, अर्थशास्त्री,
महान इतिहासकार, संविधान निर्मिता,
क्रांतीसूर्य, युगपुरुष, परमपूज्य बोधीसत्व,
महामानव, डॉ बाबासाहेब आंबेडकर
यांच्या जयंती निमित्त कोटी कोटी प्रणाम…

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा-

नमन त्या पराक्रमाला
नमन त्या देशप्रेमाला
नमन त्या ज्ञान देवतेला
नमन त्या महापुरुषाला
नमन अशा आपल्या बाबासाहेबांना
आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..!

माणसाला आपल्या दारिद्र्‌याची लाज वाटता कामा नये,
लाज वाटलीच तर ती फक्त आपल्या अंगी असलेल्या दुर्गुणांची वाटायला हवी. – डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

न्याय, समता, बंधुता यासाठी लढणाऱ्या महामानवाला सलाम
आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा!

“बुद्धिमत्तेचा विकास हे मानवी अस्तित्वाचे अंतिम लक्ष्य असले पाहिजे”आपण नेहमी काहीतरी शिकत राहिले पाहिजे.
डॉ. बाबासाहेब आंबडेकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा !!

ताज्या बातम्या