लहान मुलांना आणि मुलींना मोबाईलचे वाढते व्यसन हे आजच्या काळातील गंभीर प्रश्न बनला आहे. सतत गेम खेळणे, सोशल मीडिया वापरणे किंवा अनावश्यक व्हिडिओ पाहणे यामुळे त्यांचे अभ्यासाकडे लक्ष कमी होते. मोबाईलच्या अतिवापरामुळे झोपेचा त्रास, चिडचिड, डोळ्यांचे आजार आणि मानसिक ताण वाढू शकतो. काही मुलांमध्ये एकटे राहण्याची सवय वाढते आणि सामाजिक कौशल्ये कमी होतात. इंटरनेटवरील अयोग्य मजकूर, अनोळखी व्यक्तींशी संपर्क आणि सायबरबुलिंगचा धोका देखील वाढतो. पालकांनी वेळेची मर्यादा, सुरक्षितता सेटिंग्ज आणि ऑफलाइन क्रियाकलापांवर भर देऊन मुलांना योग्य मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. काही वेळा मुले-मुली मोबाईल देण्याचा पालकांकडे हट्ट करत मात्र मोबाईल न दिल्यास टोकाचे पाऊल देखील उचलले जाते. अशीच एक घटना नागपुरातील खापरखेडा येथे घडली आहे.
मोबाईल न दिल्याने 13 वर्षीय मुलीची आत्महत्या
मोबाईलच्या अतिवापरात मोठी वाढ झालेली आहे. याचे सर्वाधिक प्रमाण हे लहान मुलांच्याबाबतीत दिसून येत आहे. मोबाईलचा योग्य वापर असावा, पण मोबाईलच्या अतिवापराने लहान मुलांना व्यसन लागलेलं आहे. या व्यसनामुळे आता लहान मुलं आपली तहान भूक विसरून त्या चाकोरीत अडकून केले आहेत. आता तर काही मुलं आपल्या आई-वडिलांकडे मोबाईलची मागणी करू लागले आहेत. जर मोबाईल देण्यास नकार दिल्यास हट्टीपणा करतात आणि नंतर होत्याचं नव्हतं होऊन बसतं. अशीच एक घटना समोर आली आहे. एका मुलीला मोबाईल न दिल्याने लहान विद्यार्थिनीने आत्महत्या करत टोकाचं पाऊल उचललं आहे. ही घटना नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथील आहे.

दिव्या ही सोशल मीडियाचा देखील वापर करत होती. मोबाईलच्या अधिक वापराने तिचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असल्याचं तिच्या काकांचं म्हणणं आहे. मोबाईलचा वापर कमी करून अभ्यासाकडे लक्ष देण्यास त्यांनी सांगितलं. या सर्व बाबी घडल्याने लहान मुलगी दिव्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे.
लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्याच्या टिप्स
लहान मुलांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी पालकांनी काही सोप्या पण प्रभावी उपायांचा अवलंब करणे आवश्यक आहे. सर्वप्रथम घरात मोबाईल वापराची वेळ ठरवा आणि त्याचे काटेकोर पालन करा. मुलांसाठी मोबाईलशिवाय आकर्षक पर्याय तयार करा, जसे की बाहेर खेळणे, चित्रकला, पझल्स, गोष्टींची पुस्तके किंवा घरातील छोट्या जबाबदाऱ्या. पालकांनी स्वतःही मोबाईलचा कमी वापर करून मुलांसाठी योग्य उदाहरण ठेवणे महत्त्वाचे आहे. अभ्यास आणि खेळ यात संतुलन ठेवण्यासाठी मुलांना प्रोत्साहन द्या. झोपेच्या वेळेत मोबाईल पूर्णपणे दूर ठेवा. संवाद वाढवा आणि मुलांच्या भावनिक गरजा समजून घ्या, त्यामुळे ते मोबाईलकडे कमी आकर्षित होतात.











