हनी ट्रॅप प्रकरणाला नवं वळण, अटकेत असलेल्या प्रफुल्ल लोढाकडे माहिती, एसआयटी चौकशीची खडसेंची मागणी

हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढाला अटक झाल्यानं हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.

मुंबई – महाराष्ट्रात ७५ हून अधिक सरकारी अधिकारी आणि राजकीय नेते हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून आहे. यात एका महिलेनं अधिकारी आणि राजकीय नेत्यांकडून लाखो रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोपही करण्यात येतोय.

या हनी ट्रॅप प्रकरणावरुन राजकारणही रंगलंय. ठाकरे सरकार पाडताना या हनी ट्रॅपचा वापर करण्यात आला असा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केल्यानंतर आता संजय राऊतांनीही असाच आरोप केलाय. 17 ते 18 आमदार आणि 4 तरुण खासदार यांनी हनी ट्रॅप प्रकरणामुळे पक्ष सोडल्याचं त्यांनी म्हटलंय.

हनी नाही आणि ट्रॅप नाही, फडणवीसांनी केलं होतं स्पष्ट

अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना कोणतीही हनी नाही आणि ट्रॅपही नाही, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं होतं. दरम्यानच्या काळात दुसऱ्या एका हनी ट्रॅप प्रकरणात जळगावातील प्रफुल्ल लोढा या व्यक्तीला अटक करण्यात आलीय. त्यानंतर विरोधक या मुद्द्यावर आक्रमक झाले असून या प्रकरणाचा संबंध आता सरकार पाडण्याशी जोडण्यात येतोय.

वडेट्टीवार आणि राऊत यांच्या आरोपांना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही प्रत्युत्तर दिलंय.
मविआच्या नाकर्तेपणामुळे आमदार गेले, आणि यांची सत्ता गेली, त्याचा हनी ट्रॅपशी संबंध नसल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलीय.

एसआयटी चौकशीची खडसेंची मागणी

गिरीश महाजन यांचे विरोधक असलेल्या एकनाथ खडसेंनीही या प्रकरणात उडी घेत, या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केलीय. जळगावातील जामनेरचे भाजपा पदाधिकारी प्रफुल्ल लोढाला मुंबई पोलिसांनी जेरबंद केलंय. त्यावरुन राजकारण रंगताना दिसतंय. खासदार संजय राऊतांनीही प्रफुल्ल लोढाचे मंत्री गिरीश महाजनांसोबतच फोटो पोस्ट करत चौकशीची मागणी केलीय

प्रफुल्ल लोढाविरोधात कोणते गुन्हे

प्रफुल्ल लोढाविरोधात साकिनाका आणि अंधेरीत
बलात्कार, खंडणी आणि हनी ट्रॅपसंबंधी गुन्हे दाखल करण्यात आलेत. प्रफुल्ल लोढाला मुंबईतल्या चकाला
येथील लोढा हाऊसमधून अटक करण्यात आली.
मुंबई पोलिसांकडून जळगावातील जामनेरमध्ये
प्रफुल्ल लोढाच्या मालमत्तेची झाडाझडती घएतल्याची माहिती आहे. लॅपटॉप, पेन ड्राईव्ह, इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस जप्त करण्यात आलेत. दोन अल्पवयीन मुलींना नोकरीचे आमिष दाखवून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे आरोप लोढावर आहेत. एवढेच नाही तर मुलींना लोढा हाऊसमध्ये डांबून
ठेवत धमकवलं हेही आरोप आहेत.

विशेष म्हणजे राज्यात महाविकास आघाडीचं सरकार असताना प्रफुल्ल लोढाने गिरीश महाजनांवर आरोप केले होते मात्र 2024 मध्ये भाजपात प्रवेश केल्यापासून प्रफुल्ल लोढा गिरीश महाजनांचा समर्थक म्हणून ओळखला जातोय

प्रफुल्ल लोढाची पार्श्वभूमी

जळगावच्या जामनेर तालुक्यातील पहुरगावात व्यापारी संकुल आहे. मुंबईतील चकाला
परिसरात चकाला हाऊस नावाने अलिशान बंगला आहे. प्रफुल लोढा सुरुवातीच्या काळात गिरीश महाजन यांचा निकटवर्तीय होता. नंतरच्या काळातगिरीश महाजन आणि प्रफुल्ल लोढा यांच्यात अंतर पडले. तुम्ही ईडी लावाल तर मी सीडी लावेल असा
इशारा एकनाथ खडसेंनी दिला होता.खडसेंच्या इशाऱ्यानंतर त्यावेळी प्रफुल्ल लोढाच्या पहुर येथील घरावर छापा पडला होता प्रफुल्ल लोढांकडे अश्लीलसीडी असून त्यांच्या विश्वासावरच एकनाथ खडसे यांनी ते वक्तव्य केल्याची चर्चा त्यावेळी रंगली होती

2024 लोकसभा निवडणुकीत लोढाला वंचितकडून उमेदवारी अर्ज दाखल, 5 दिवसांनी माघार घेतली. 2024 मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश घेतला.

हनी ट्रॅपचा भांडाफोड होणार?

राज्यातील 72 अधिकाऱ्यांसह काही आजी माजी मंत्री हनी ट्रॅपमध्ये अडकल्याची शंका व्यक्त केली जात आहे. या हनी ट्रॅपचा केंद्रबिंदु नाशिकमधील पंचतारांकीत हॉटेल असल्याचं बोललं जातंय
आता हनी ट्रॅप प्रकरणी प्रफुल्ल लोढाला अटक झाल्यानं हनी ट्रॅप प्रकरणाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती मिळण्याची शक्यता आहे.


About Author

Smita Gangurde

Other Latest News