5 डिसेंबरला राज्यातील शाळा राहणार बंद; अचनाक शाळा बंद ठेवण्याचे कारण काय?

महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे.

महाराष्ट्रातील सर्व शाळा 5 डिसेंबरला बंद राहणार आहेत. महाराष्ट्रातील शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी 5 डिसेंबर रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. हे आंदोलन मुख्यतः शिक्षक पात्रता परीक्षा (TET) सक्ती, संच मान्यता संदर्भातील शासन निर्णय रद्द करण्यासाठी आणि इतर प्रलंबित मागण्यांसाठी आहे. या आंदोलनामुळे राज्यातील शाळा बंद राहणार आहे. राज्यव्यापी शाळा बंदचा पुण्यातून एल्गार करण्यात आला आहे. मुख्याध्यापक महामंडळाने राज्यव्यापी संपाचा इशारा दिला आहे.

5 डिसेंबरला शाळा बंदचे कारण ?

पुण्यात आज पार पडलेल्या बैठकीत मुख्याध्यापक महामंडळाने निर्णय घेतला आहे. येत्या ५ डिसेंबर रोजी राज्यातील शाळा बंद ठेवून सर्व जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्या आहेत. या मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने हे मोर्चे काढले जाणार आहेत. हे मोर्चे राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यात काढण्यात येणार आहेत. हे मोर्चे काढण्या मागे शिक्षकांच्या काही मागण्या आहेत. त्यानुसार  राज्यातील 2013 पूर्वी नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना टीईटी परीक्षा अनिवार्य करू नये ही त्यातील मुख्य मागणी आहे. टीईटी परिक्षा अनिवार्य केल्याचा फटका अनेक शिक्षकांना बसणार असल्याचं बोललं जात आहे.

नेमक्या मागण्या आहेत तरी काय ?

15 मार्च 2024 रोजीचा संचमान्यता शासन निर्णय रद्द करावे. शिवाय जुन्या निकषाप्रमाणे संचमान्यता करण्यात यावी अशी ही मागणी आहे. याशिवाय शिक्षणसेवक योजना रद्द करून सर्व शिक्षकांना नियमित वेतनश्रेणी लागू करावी या तीन प्रमुख मागण्या शिक्षकांच्या आहेत. गेल्या अनेक वर्षापासून ही शिक्षकांची मागणी आहे. पण ही मागणी करून ही त्याचा काही एक परिणाम होत नाही. निर्णय ही होत नाही. त्यामुळे शेवटी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने संपाची हाक दिली आहे.

महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघाने दिलेल्या या संपाचा परिणाम राज्यातील शाळांवर होणार आहे. सर्व शिक्षक मोर्चात जाणार असल्याने शाळा बंद ठेवल्या जातील. त्या दिवशी शिक्षक शाळेत हजर राहाणार नाहीत. त्यामुळे त्या दिवशी शाळा आपोआप बंद राहाणार आहेत. शुक्रवारी पाच तारीख येत आहे. त्याच दिवशी हा संप पूकारण्यात आला आहे. यासाठी आणखी चार दिवस आहे. तो पर्यंत सरकार काही निर्णय घेतं का याकडे शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून मागणी केली जात आहे.या मागण्या पूर्ण होत नसल्याचे संपाचा इशारा दिला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News