Sanjay raut Vs BJP – अडीच वर्ष घरात लपलेले, आता नोटिसा पाहून थरथरत आहेत. अडीच वर्ष उद्धव ठाकरेंच्या सावलीत घरात लपलेले राऊत आता कायद्याच्या नोटिसांवर आरोळ्या ठोकतायत. नोटिसा त्यांनाच येतात जे खंडणीखोर, दलाल आणि देशविरोधी कारवायांत गुंतलेले असतात. अमित शाह यांच्या नावानं राऊत थरथर कापतात. कारण अपराध्यांच्या आत्म्यातच भीती बसलेली असते. घरात लपून बसलेले अडीच वर्षांचे मुख्यमंत्री आणि त्यांचे पगारी नेते आज गृहमंत्र्यांवर टीका करताहेत, हेच दुर्दैव आहे, अशी टिका भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांचं संजय राऊत यांच्यावर केली आहे. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला, त्यावेळी ते बोलत होते
संजय राऊत ‘गांजा पुरुष’
दरम्यान, अमित शाह यांनी ३७० हटवलं, राममंदिर बांधलं; राऊतांना गाढव नाक्यावर चिरा तरी उभारला का? असा सवाल बन यांनी उपस्थित केला. शाह यांचं नाव घेताच देशभक्त उभे राहतात, आणि राऊतांसारखे देशद्रोही थरथर कापतात. अमितभाई लोहपुरुष राष्ट्ररक्षक आहेत, तर संजय राऊत ‘गांजा पुरुष’ असल्याची बोचरी टिका नवनाथ बन यांनी संजय राऊतांवर केली. हिंदुत्वासाठी लढणारे राणे विरुद्ध पब आणि पेंग्विनसाठी धावणारे तुम्ही कुठे… नितेश राणे हिंदुत्वासाठी रणांगणात, आणि तुम्ही पब, पेंग्विनसाठी मैदानात उतरता. राणे हिंदू एकतेसाठी बोलतात, राऊत मात्र अफजलखानाच्या पिल्लावळीसाठी सभा घेतात, असा हल्लाबोल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन यांनी संजय राऊत यांच्यावर केला आहे.

दि.बा. पाटील नावावर राऊतांचा पोटशूळ
राणे भगव्या झेंड्याखाली उभे, राऊत मात्र हरित टोळीला खुश करणारे आहेत. राणे छत्रपतींचा जयजयकार करतात, राऊत भेंडी बाजारच्या गल्लीतील टोळ्यांचा जयघोष करतात. नवी मुंबई विमानतळ – दि.बा. पाटील नावावर राऊतांचा पोटशूळ का आहे. दि.बा. पाटील नाव ऐकताच राऊतांच्या पोटात दुखायला लागलं आहे का, भूमिपुत्रांच्या सन्मानाचा शत्रू कोण हे उघडलं आहे. मराठी माणसाला मुंबईतून हद्दपार करणाऱ्यांना आज भूमिपुत्रांच्या नावाचं अपचन झालं आहे. दि.बा. पाटील यांच्या नावानं भूमिपुत्रांचा सन्मान झाला, पण पगारी नेते राऊतांचा अहंकार आहे, अशी टिका भाजपाने राऊतांवर केली आहे.