Amravati – Tirupati Train : महाराष्ट्रातून तिरुपती बालाजीच्या दर्शनाला जाणारे अनेक भाविक आहेत. तिरुपतीला जाण्यासाठी राज्यातून एसटी बस, रेल्वे आणि विमानाची सुविधा आहे. आता तिरुपतीला जाणाऱ्या भक्तांसाठी आणखी एक ट्रेन उपलब्ध करण्यात आली आहे. मध्यंतरी तिरुपती बालाजीला जाणाऱ्या भाविकांची वाढलेली संख्या पाहता रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून विदर्भातील अमरावती ते तिरुपती बालाजी यादरम्यान विशेष गाडी चालवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आता या विशेष गाडीची मुदत संपत असतानाच रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून या विशेष गाडीला मुदतवाढ देण्याचा एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. रेल्वे विभागाच्या या निर्णयामुळे विदर्भातील बालाजी भक्तांना मोठा फायदा होणार आहे.
कधीपर्यंत धावणार तिरुपतीची ट्रेन (Amravati – Tirupati Train)
मिळालेल्या माहितीनुसार अमरावती ते तिरुपती बालाजी यादरम्यान चालवली जाणारी स्पेशल ट्रेन आता 29 जानेवारी 2026 पर्यंत धावणार आहे. त्यामुळे जर तुम्ही डिसेंबर किंवा जानेवारीमध्ये तिरुपती दर्शनाला विचार करत असाल तर आत्ताच या ट्रेनची बुकिंग तुम्ही करू शकता. Amravati – Tirupati Train

कसे आहे वेळापत्रक ?
अमरावती-तिरुपती एक्स्प्रेस आठवड्यातून दोन वेळा धावते. ही रेल्वे सोमवार आणि गुरुवार सकाळी 6.45 वाजता अमरावतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 6.25 वाजता तिरुपती रेल्वे स्टेशनवर पोहचते. तर तिरुपती-अमरावती एक्स्प्रेस आठवड्यातून तीन दिवस चालवली जाते. ही रेल्वे मंगळवार, गुरुवार आणि शनिवार दुपारी 3.45 वाजता तिरुपतीहून सुटते आणि दुसऱ्या दिवशी 3.10 वाजता अमरावतीला पोहोचते.
रेल्वे विभागाने या ट्रेनला मुदतवाढ दिल्याने याचा फायदा अमरावती अकोला हिंगोली वाशिम या जिल्ह्यातील तिरुपती बालाजीच्या भाविकांना होणार आहे. त्यांचा बालाजीचा प्रवास अत्यंत आरामदायी होऊ शकतो.











