धक्कादायक, पुण्यात आणखी एक जमीन घोटाळा; 15 एकर सरकारी जागेची परस्पर विक्री

पार्थ पवारांच्या जमीन घोटाळ्याच्या प्रकरणानंतर पुण्यातून आणखी एक जमीन घोटाळा उघडकीस आला आहे. पुण्यातील 15 एकर जमिनीशी संबंधित हे प्रकरण आहे.

पार्थ पवारांचं पुण्यातील 1,800 कोटींच्या जमिनीच्या गैरव्यवहाराचे प्रकरण शांत होत नाही तोवर आणखी एक दुसर सरकारी जमिनीच्या घोटाळ्याचं प्रकरण समोर आलं आहे. ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

प्रकरण नेमकं काय आहे ?

ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. पिंपरी चिंचवड शहरातील ताथवडे परिसरातील पशुसंवर्धन विभागाची सर्वे नंबर 20 येथील 15 एकर जागेची परस्पर विक्री कोट्यावधी रुपयात करण्यात आली आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची विक्री परस्पर केली आहे.

पशुसंवर्धन विभागाला अंधारात ठेवून य जागेची विक्री करण्यात आली आहे. मुद्रांक शुल्क विभागाकडून याबाबतची माहिती जेव्हा पशुसंवर्धन विभागाला कळविण्यात आली. त्यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या आयुक्तांनी या विषयाची तक्रार पुण्याचे विभागीय आयुक्ताकडे केली आहे. आता या प्रकरणात पुण्याचे विभागीय आयुक्त आणि पशुसंवर्धन विभागाकडून चौकशी सुरू आहे.

जमीन लाटण्याचे कारनामे

पिंपरी चिंचवड शहरातील कोट्यावधी रुपयाची शासकीय मोक्यची जागा या निमित्ताने लाटण्याचा प्रकार पुन्हा एकदा  उघडकीस आला आहे.  आता या प्रकरणाबाबत तपास सुरू आहे. मोठं शासकीय जमीन घोटाळा प्रकरण समोर आलं आहे. ताथवडे येथील 15 एकर शासकीय जागेची परस्पर विक्री करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हेरंब गुपचूप नावाच्या व्यक्तीने जानेवारी 2025 मध्ये या जागेची स्परस्पर विक्री केली आहे, त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय कारवाई होणार हे पहाणं महत्त्वांच ठरणार आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News