मोठी बातमी! म्हाडा आता भाडेतत्वावर देणारे घरे; धोरणाचा मसुदा तयार

सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात घरे उपलब्ध करून देणारी संस्था म्हाडाने गृहनिर्माण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकले आहे. भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण उभे करण्याची तयारी म्हाडने दाखवली असून त्याचा प्रारूप मसुदा देखील सादर करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

महागड्या घरांमुळे मुंबई शहरातील घरांना सध्या अत्यल्प अशा स्वरूपाचा प्रतिसाद मिळतोय. म्हाडाच्या लॉटरीला देखील प्रतिसाद कमी असल्याचे दिसत आहे. अशा परिस्थितीत म्हाडाने आता नवीन योजना आणण्याची तयारी केली आहे. म्हाडा भाडेतत्वावर घरे देणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने म्हाडाने काही महत्वाची पाऊल उचलण्यास सुरूवात केल्याची माहिती देखील समोर येत आहे.

आता म्हाडाची घरे भाड्याने मिळणार !

मुंबईत स्वतःचे घर असावे, ही इच्छा असंख्य कुटुंबांची असते. परंतु शहरातील आभाळाला भिडणाऱ्या किमतींमुळे अनेकांची ही इच्छा स्वप्नातच राहते. अशावेळी मध्यमवर्गीय आणि कमी उत्पन्न गटातील नागरिकांसाठी परवडणारी घरे उपलब्ध करून देणारी संस्था म्हणजे म्हाडा. आता याच म्हाडाने गृहनिर्माण क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचे पाऊल टाकत भाडेतत्त्वावरील घरांसाठी नवे धोरण उभे करण्याची तयारी दाखवली असून त्याचा प्रारूप मसुदा सादर करण्यात आला आहे, अशी माहिती समोर येत आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News