महाराष्ट्राच्या राजकारणासंदर्भात दिल्लीतून मोठी माहिती खरंतर समोर येत आहे. महाराष्ट्रातील भाजप खासदारांची आज पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतची बैठक पार पडली. आज सकाळी १० वाजता केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत बैठक झाली त्यानंतर १० वाजून २५ मिनिटांनी सर्व खासदार पंतप्रधानांच्या दालनात दाखल झाले. संसदीय कामातील सहभाग तसेच पक्ष, राजकीय परिस्थितीवर या बैठकीमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.
नेमकं भेट कशासाठी, कारण काय ?
आज शेतकऱ्यांच्या मदतीच्या प्रस्ताववर दिल्लीत बैठक होणार आहे. बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज मदत जाहीर केली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान आज पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांची बोलविली बैठक बोलावली होती.सकाळी साडे दहा वाजता ही बैठक पार पडली. संसदेतील पंतप्रधान कार्यालयात ही बैठक पार पडली. बैठक बैठकीला राज्यसभा आणि लोकसभाचे भाजप खासदार उपस्थित होते.

यामध्ये राज्यसभेतून धनंजय महाडीक,अनिल बोंडे, भागवत कराड,अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे, धैर्यशील पाटील, उज्ज्वल निकम तर लोकसभेतून नितीन गडकरी, नारायण राणे, मुरलीधर मोहोळ, हेमंत सावरा, अनुप धोत्रे, स्मिता वाघ, पियुष गोयल उपस्थित राहिल्याची माहिती समोर येत आहे. पंतप्रधानांच्या बैठकीपूर्वी पियुष गोयल यांच्या कार्यालयात महाराष्ट्रातील भाजप खासदारांची बैठक झाली होती.त्यानंतर पियुष गोयल यांच्या सोबत सर्व खासदार पंतप्रधान मोदींच्या भेटीला गेले.
पंतप्रधान मोदींनी खासदारांना सुनावलं ?
महाराष्ट्रातील सर्व भाजप खासदारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. यावेळी लोकसभा आणि राज्यसभेमधील भाजपचे खासदार उपस्थित होते, यावेळी पंतप्रधान मोदींनी संसदीय कामकाज यातील सहभाग आणि सरकारची प्रतिमा, खासदार करत असलेली काम याबाबतची चर्चा केली, सध्याच्या राजकीय परिस्थितीवर त्यांनी त्यांची मत देखील जाणून घेतली. त्याचबरोबर संसदीय कामकाजात सहभाग घेणे, सक्रिय सहभाग नोंदवणे, याबाबत सर्व खासदारांचा मत लक्षात घेण्यात आलं. सकाळी दहा वाजता पहिल्यांदा पियुष गोयल यांच्या दालनामध्ये सर्व खासदार एकत्रित जमले होते, तिथून पुढे हे सर्व खासदार दहा वाजून 25 मिनिटांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात पोहोचले.
मिळालेल्या माहितीनुसार काल गणपूर्ती होऊ शकलेली नव्हती, लोकसभेचे कोरम पूर्ण झालेला नव्हता, त्यामुळे बेल वाजली. जेव्हा लोकसभेमध्ये कोरम पूर्ण होत नाही बेल वाजवावी लागते, तर हे सरकारी पक्षाचं अपयश समजलं जातं, लोकसभेच्या सभागृहात किमान 50 खासदार तरी कामकाजासाठी उपस्थित असावे लागतात, आणि काल भाजपाचे खासदार आणि सत्ताधारी पक्षांचे खासदार खूप कमी संख्येने उपस्थित होते, त्यामुळे कोरम पूर्ण झाला नाही. या सर्व बाबतीत एक व्यवस्थित फ्लोअर मॅनेजमेंट असला पाहिजे, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वरिष्ठमंत्र्यांकडे नाराजी देखील व्यक्त केली अशी माहिती समोर आली आहे, त्याचबरोबर नरेंद्र मोदी हे इतर राज्यातील खासदारांची अशाच प्रकारे संवाद साधणार असल्याचं आणि भेटणार असल्याची माहिती आहे.