MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

मुंबईतील मुसळधार पावसानंतर आरोग्य विभाग अलर्ट; डेंग्यू, मलेरियाला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू

Written by:Rohit Shinde
Published:
बीएमसीने हंगामी आजारांशी लढण्यासाठी पूर्वसूचना आणि तयारी आधीच सुरू केली होती. राजावाडी रुग्णालयात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र मानसून वॉर्ड्स उभारले आहेत.
मुंबईतील मुसळधार पावसानंतर आरोग्य विभाग अलर्ट; डेंग्यू, मलेरियाला आळा घालण्यासाठी उपाययोजना सुरू

मुसळधार पावसानंतर मुंबईत डेंग्यू आणि मलेरियाचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचते आणि डासांच्या प्रजननासाठी अनुकूल वातावरण तयार होते. विशेषतः एडीस डास डेंग्यूचा तर अ‍ॅनोफिलीस डास मलेरियाचा प्रसार करतात. पाणी साचलेल्या जागा, नाले, गटारे आणि उघडी भांडी ही डासांची मुख्य उत्पत्तीस्थाने ठरतात. त्या पार्श्वभूमीवर बीएमसी आणि आरोग्य विभाग आता सतर्क झाला आहे. मुंबईत पावसामुळे परिस्थिती बिकट झाली आहे. मॉन्सूनमुळे लोकांची समस्या वाढली असून, पावसामुळे आणि पाणी साचल्यामुळे शहरात डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारखे हंगामी आजार पसरण्याची भीती बीएमसीला आहे. यामुळे नागरिकांना या आजारांपासून वाचवण्यासाठी बीएमसीने रस्त्यांपासून हॉस्पिटलपर्यंत व्यापक तयारीसह मोहीम सुरू केली आहे.

जनजागृती आणि उपाययोजना सुरू

मॉन्सून तुलनेने शांत झाला आहे. मात्र, बुडालेले भाग आणि साचलेले पाणी डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांसाठी कारणीभूत ठरत आहेत. येत्या दिवसांत लेप्टोस्पायरोसिस  सारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतोय. त्यामुळे बीएमसीने झोपडपट्ट्यांमध्ये फोगिंग, सॅनिटायझेशन आणि घराघरांमध्ये औषध वितरणाची मोहीम युद्धस्तरीय सुरू केली आहे. मुंबईत डेंग्यू, मलेरिया, टायफॉईड यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढतात. गेल्या पावसामुळे रुग्णसंख्या अचानक वाढल्याने बीएमसीच्या रुग्णालयांमध्ये मानसून वॉर्ड्स उभारण्यात आले आहेत.

सध्या बीएमसीने हंगामी आजारांशी लढण्यासाठी पूर्वसूचना आणि तयारी आधीच सुरू केली होती. राजावाडी रुग्णालयात पुरुषांसाठी आणि महिलांसाठी स्वतंत्र मानसून वॉर्ड्स उभारले आहेत. गेल्या काही दिवसांत मॉन्सूनमुळे रुग्णसंख्या झपाट्याने वाढल्याने वॉर्ड्सची क्षमता वाढवण्यात आली आहे.

डेंग्यू, मलेरियापासून बचावाच्या पद्धती

डेंग्यू आणि मलेरियापासून बचाव करण्यासाठी स्वच्छता आणि डास नियंत्रण महत्त्वाचे आहे. घराभोवती पाणी साचू देऊ नये, कारण डासांची उत्पत्ती तिथूनच होते. जुनी टाकी, कुलर, गटारे किंवा फेकलेल्या डब्यांमध्ये पाणी राहू देऊ नये. मच्छरदाणी, डासप्रतिबंधक क्रीम किंवा कॉइलचा वापर करावा. खिडक्यांना जाळ्या लावल्यास डास घरात प्रवेश करू शकत नाहीत. लहान मुलांना आणि वयोवृद्धांना विशेष काळजी घ्यावी. झोपताना पूर्ण कपडे परिधान करावेत. शासकीय आरोग्य विभागाकडून फवारणी व औषधोपचार वेळोवेळी केले जातात. योग्य प्रतिबंधक पावले उचलल्यास डेंग्यू आणि मलेरियापासून प्रभावी बचाव करता येतो आणि आरोग्य सुरक्षित राहते.