दहावी आणि बारावी या परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाच्या टप्प्या आहेत. या दोन वर्षांत घेतलेले निर्णय आणि केलेला अभ्यास त्यांच्या पुढील शिक्षणाच्या आणि करिअरच्या दिशेचा पाया घालतात. दहावी ही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रवासातील पहिली मोठी सार्वजनिक परीक्षा असते. या टप्प्यावर विद्यार्थ्यांना त्यांच्या आवडी-निवडी आणि क्षमतांची जाणीव होते. बारावी ही करिअर ठरवणारी परीक्षा मानली जाते. या टप्प्यावर घेतलेले गुण आणि विषय विद्यार्थ्यांना पुढील पदवी अभ्यासक्रम, स्पर्धा परीक्षा आणि व्यावसायिक क्षेत्रात प्रवेश मिळवण्यासाठी मदत करतात. मात्र आता दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आणि पालकांना बोर्डाने चांगलाच धक्का दिला आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ
राज्यातील दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण, शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वर्षी 10वी आणि 12वीच्या परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली आहे. ऐन महागाईत आता बोर्डाने परीक्षा शुल्कात वाढ केल्याने पालकांनी नाराजी व्यक्त केली आहे.
वाढता प्रशासकीय खर्च आणि महागाईचा परिणाम या सर्वांमुळे परीक्षा शुल्कात वाढ करण्यात आली असल्याचं बोललं जात आहे. परीक्षा शुल्कात 50 रुपयांनी वाढ केली आहे. दहावीच्या नियमित विद्यार्ध्यांच्या परीक्षा शुल्कात वाढ झाल्याने आता 520 रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी हे शुल्क 470 रुपये इतके होते.

तर बारावीच्या नियमित विद्यार्थ्यांना आता परीक्षा शुल्क म्हणून 540 रुपये भरावे लागणार आहेत. यापूर्वी हे परीक्षा शुल्क 490 रुपये इतके होते. गेल्या काही वर्षांपासून परीक्षा शुल्कात वाढ होत आहे. त्यामुळे पालकांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.











