मुंबई- वरळीच्या कोळीवाड्यात नारळी पोर्णिमेला दोन्ही शिवसेनेत शिमगा रंगला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे समोरासमोर आले. त्यानंतर आक्रमक झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये पोलिसांनी मध्यस्थी करत पडदा टाकलामात्र आता या वादाला नवं वळण मिळालंय
यावेळी आमदार सुनील शिंदेंच्या मुलानं धक्काबुक्की केल्याचा आरोप शिवसेनेच्या महिला शाखाध्यक्षानं केलाय
याप्रकरणी सिद्धेश शिंदेंविरोधात दादर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आलीय
महिलेला धक्काबुक्कीची तक्रार हे राजकारण- सचिन अहिर
शिंदेंच्या शिवसेनेच्या महिला शाखाध्यक्षांनी केलेली ही तक्रार हे राजकारण असल्याची टीका ठाकरे सेनेचे नेते सचिन अहिर यांनी केलीय. कालचा प्रकार सगळ्यांनी पहिला.
सिद्धेश शिंदे अत्यंत हुशार आणि युवकाना प्रेरणा देण्याचे काम करतो पण टार्गेट ठेवून हे काम करण्यात आलं आहे.
तक्रार केलेल्या नेत्यांत आपलंही नाव घेतलं असल्याचं अहिर म्हणालेत. हा केवळ बदनामी आणि सूड उगवण्याचा प्रयत्न झालाय, अशी टीका अहिर यांनी केलीय
वरळीत काल काय घडलं?
वरळीत नारळी पोर्णिमेनिमित्त उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. पोलिसांनी मध्यस्थी करत एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे यांना जाण्यासाठी मार्गही करुन दिला
मात्र यावेळी दोन्ही शिवसेनेचे कार्यकर्ते आक्रमक झालेत
अरुंद गल्लीतून दोन्ही नेते पास होत असताना कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की झाल्याचं पाहायला मिळालं
पोलिसांनी दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना वेगळं करण्याचा प्रयत्न केला. यावेळी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. ठाकरेंचे कार्यकर्ते गद्दार , गद्दार अशा घोषणा देत होतो. आमदार सुनील शिंदेंनी आमदार आदित्य ठाकरे यांना प्रोटेक्ट करण्याचा प्रयत्न देखील केला.
दादागिरी मोडून काढू- संजय राऊत
कोणत्याही संघर्षाला तयार आहे, जर कोणाला आमच्याशी संघर्ष करायचा असेल तर कोणताही संघर्ष आमची त्या संघर्षाला तयारी आहे, अशी प्रतिक्रिया ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी दिलीय. संघर्ष शिवसेनेच्या पाचवीला पुजलेला आहे. वरळी कोळीवाड्यात आदित्य ठाकरे असताना राज्याचे उपमुख्यमंत्री पोलिसांचा फौजफाटा जाऊन दादागिरी करत असतील, तर आम्ही ती दादागिरी मोडून काढू, असं राऊत म्हणालेत.
वरळीत संघर्ष तीव्र होणार?
वरळी हा आदित्य ठाकरे यांचा बालेकिल्ला मानला जातो
दरवर्षी नारळी पोर्णिमेला आमदार आदित्य ठाकरे कोळी बांधवांना उत्साहात सहभागी होतात. शिवसेनेचे दोन भाग झाल्यानंतर एकनाथ शिंदे देखील मुंबईतील मराठी बहुल भागात फिरताय. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या राजकारण तापू लागलं आहे. त्यामुळं भविष्यात हा संघर्ष अजून तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे





