पंढरपुरात मोठी घडामोडी; बीव्हीजी कंपनीने मंदिरातील कर्मचाऱ्यांना वाटला चिकन मसाला, काय प्रकरण?

पंढपुराच्या विठ्ठल रूक्मिणी कर्मचाऱ्यांच्या बाबतीतील एक धक्कादायक अशी घटना समोर येत आहे. बीव्हीजी कंपनीकडून कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट देण्यात आला आहे.

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरलं आहे. बीव्हीजी कंपनीकडून आउट सोर्सिंग पद्धतीने सुरक्षारक्षक व इतर कर्मचारी पुरवले जातात. याच कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट म्हणून चिकन मसाला देण्यात आला. त्यामुळे या घटनेमुळे आता मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

मंदिरातील कर्मचाऱ्यांना चिकन मसाला भेट

दिवाळीनिमित्त अनेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांना काहीतरी भेट देत असतात. मात्र, पंढरपूरसारख्या  वारकरी संप्रदायाच महत्वाचं ठिकाण असलेल्या शहरात शाकाहार हा सर्वश्रेष्ठ हार मानला जातो. मांसाहार मद्यपान अशा गोष्टींना वारकरी सांप्रदाय विठ्ठल भक्तांमध्ये थारा नाही. मात्र, पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना बीव्हीजी कंपनीकडून चिकन मसाला भेट देण्यात आला आहे. त्यामुळे वारकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण पसरलं आहे.या घटनेमुळे मोठ्या प्रमाणावर सध्या वारकरी संप्रदायात चिकन मसाल्याच्या भेटवस्तूबाबत संताप व्यक्त केला जात आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने देखील या कंपनीवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, कंपनीला नोटीस बजावली आहे.

वारकरी संप्रदाय आणि नागरिकांमध्ये संताप

‘आता दिवाळी सणाला सुरुवात झालेली आहे, मोठ्या प्रमाणात भाविक फक्त पांडुरंगाच्या आणि रुक्मिणी मातेच्या दर्शनाला येत आहेत. आपण सुरक्षारक्षक खाजगी कंपनीकडून घेतलेले आहेत, बीव्हीजी कंपनीकडून सुरक्षारक्षकांना दिवाळीचे गिफ्ट दिलं आहे. त्या गिफ्टमध्ये विविध प्रॉडक्ट आहेत. तसंच, मसाले आहेत आणि त्याच्यामध्येच चिकन मसाला सुद्धा आहे.

सदरची घटना लक्षात आल्यानंतर ताबडतोब कंपनीने वाटप थांबवलेलं आहे. मसाले असले तरी त्याच्यावरती जे छायाचित्र आहे ते आक्षेपार्ह आहे. पांडुरंगाच्या या पवित्र भूमीत या मंदिराचा आणि येथील सर्वांनीच या मंदिराचे पावित्र्य जपणं गरजेचं आहे. सदरची बाब मंदिर समितीने गांभीर्याने घेतलेली आहेत सदर कंपनीला कालच मंदिर समितीमार्फत नोटीस दिलेली आहे आणि निश्चितच त्याच्यावरती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. मंदीर समितीने देखील या प्रकरणात आता आक्रमक अशी भूमिका घेतली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News