नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. सप्तश्रृंगी गडावर कारचा भीषण अपघात झाला आहे. इनोव्हा कार सप्तश्रृंगी गडावरून दरीत कोसळली या अपघातामध्ये पाच जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. सप्तश्रृंगी गडाच्या गणपती पॉइंटजवळ हा अपघात घडला आहे. संरक्षण कठाडे तोडून कार खोल दरीत कोसळली, या घटनेत सप्तश्रृंगी मातेचं दर्शन घेऊन घराकडे परतणाऱ्या पाच भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांकडून घटनास्तळी धाव घेण्यात आली आहे. बचावकार्य सुरू करण्यात आलं आहे, मात्र ही दरी खोल असल्यामुळे बचाव कार्यात अडथळे निर्माण होत आहेत.
अपघात नेमका कसा झाला ?
सप्तश्रृंगी देवीच्या दर्शनासाठी दर रविवारी भाविकांची गर्दी होत असते. भाविक मनोभावे देवीच्या दर्शनासाठी इथे येत असतात. याशिवाय शनिवार आणि रविवारी सुट्टी असल्याने सप्तश्रृंगी गडावर भाविकांची गर्दी असते. अशाचप्रकारे पाच भाविक हे इनोव्हा कारने देवीच्या दर्शनाला गेले होते. ते देवीचं दर्शन घेऊन परतत असताना घाटात मोठी दुर्घटना घडल्याची माहिती आहे. संरक्षण कठडा तोडून इनोव्हा कार घाटात कोसळल्याची माहिती आहे. या अपघातात 5 जणांचा मृत्यू झाल्याची भीती वर्तवली जात आहे. अपघातग्रस्थांना वाचवण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न केले जात आहेत. स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासनाकडून बचाव कार्य सुरु करण्यात आली आहे. पण दरी खोल असल्याने बचावकार्यात अडथळा येत असल्याची माहिती आहे.

दरम्यान, या घटनेनंनतर बचावकार्याचा एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत काही लोकं हे रस्त्यावरुन उभे राहून दरीच्या दिशेला पाहताना दिसत आहेत. खोल दरीत जिथे कार कोसळली आहे तिथे पाच-सहा जण पोहोचलेले दिसत आहेत. त्यांच्याकडून अडकलेली गाडी बाजूला करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. या घटनेतील अपघाग्रस्तांना जीव वाचावा यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. तसेच कारदेखील बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.
सा. बांधकाम विभाग जबाबदार ?
दरम्यान अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. अपत्ती व्यवस्थापन पथक आणि स्थानिक नागरिकांकडून घटनास्थळी बचाव कार्याला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र कार खोल दरीत कोसळल्यानं बचाव कार्यात अडथळा निर्माण होत आहे. बचाव कार्य सुरू आहे. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरीकांसह पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे. तर आपत्ती व्यवस्थापनाकडून लागलीच बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. घाटाच्या सरंक्षक भितींचे काही अपूर्ण असल्यामुळे हा अपघात घडल्याचे स्थानिक नागरिकांनी म्हटले आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावरही ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे.











