खरंतर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांच्या मनामध्ये सातत्याने अनेक प्रश्न उपस्थित राहत असतात. लाडकी बहीण योजनेचा भवितव्य काय? ही योजना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर बंद पडणार का? असा सवाल सातत्याने उपस्थित होत असतो. त्यावर खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उत्तर दिले आहे. नेमकं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय म्हटलं आहे, ते सविस्तर जाणून घेऊ…
देवाभाऊंचे बहिणींना मोठे वचन !
पालघर जिल्ह्यात सुरू असलेल्या नगरपरिषदेच्या निवडणूकीच्या प्रचारादरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच पालघर जिल्ह्यातील डहाणू येथे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार भरत राजपूत यांच्यासाठी जाहीर सभेला संबोधित केले. पालघरमधील सभेला संबोधित करताना मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, ” देवाभाऊ सत्तेत असेपर्यंत लाडकी बहीण योजना बंद केली जाणार नाही, असे मी वचन देतो. ” त्यामुळे या विधानाची सर्वत्र चर्चा झाली.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही जास्त दिवस सुरू राहणार नाही आणि लवकरच योजना बंद होईल अशा प्रकारची विधाने विरोधकांकडून करण्यात येत असतात. असे असतानाच योजनेचा हप्ता मिळण्यास गेल्या काही महिन्यांपासून उशिर होत आहे. तसेच केवायसी अनिवार्य केल्याने निकषात बसत नसल्याचं म्हणत योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे लाडकी बहीण योजना सुरू राहणार की बंद होणार?
योजनेत आपले नाव कायम राहणार की नाव वगळणार? असे प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनात उपस्थित होत आहेत. मात्र आता खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीच या योजनेच्या भवितव्याबाबत महत्वपूर्ण विधान केले आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना दिलासा मिळण्यास मोठी मदत होणार आहे.
नोव्हेंबरचे पैसे कधी आणि कुणाला मिळणार?
दर महिन्याला लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या पैशांबद्दल आता नवी अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर महीना सुरू होऊन संपायला आला, आज 27 तारीख उजाडली तरी राज्यातील लाडक्या बहिणींना अद्याप या महिन्यात हप्ता मिळालेला नाही. या महिन्याचे 1500 रुपये काही लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झालेले नाही. त्याचबद्दल आता मोठी अपडेट समोर आली आहे.
नोव्हेंबर महिना सुरु होऊन 27 दिवस उलटून गेले, आजची 27 तारीख आली तरी नोव्हेंबर महिन्याच्या हप्त्याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नव्हती. सध्या राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजत असून आचारसंहितेच्या काळात महिलांच्या खात्यात पैसे येणार की नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात होता. मात्र आता लाडक्या बहिणींच्या खात्यात लवकरच हे पैसे जमा केले जातील अशी चर्चा सुरू आहे.
त्यानुसार निवडणुकीच्या आधीच लाडक्या बहिणींना पैसे मिळण्याची चिन्हं आहेत. नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात महिलांना पैसे देण्याची शक्यता वर्तवली जात आहे. शिवाय ज्या महिलांची ई-केवायीस करायची राहिली आहे, त्यांना देखील या महिन्यात लाभ मिळणार आहे. त्यामुळे तात्काळ ई-केवायसी करून घ्यावी. अद्याप ई-केवायसी नसेल तरी महिलांना १,५०० रूपयांचा नोव्हेंबर महिन्याचा लाभ मिळणार आहे.











