MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

नदीजोड प्रकल्पातून खेड्यात जलसंधारणाच्या कामातून पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Written by:Astha Sutar
Published:
बळीराजा योजनेच्या माध्यमातून 90 योजना साकारल्या आहेत. जलयुक्त शिवार योजना राबवित जलसंवर्धन कार्यक्रमावर आपण भर दिला. योजनेच्या माध्यमातून राज्यात लोकसहभागातून व्यापक चळवळ निर्माण झाली. जलसंधारणासाठी लोकसहभागातून उभा केला. या क्रांतीकारी निर्णयातून सुमारे 20 हजार गावांमध्ये पाण्याचे चित्र बदलल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
नदीजोड प्रकल्पातून खेड्यात जलसंधारणाच्या कामातून पाणी प्रश्नावर यशस्वी मात करु, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Devendra Fadnavis : राज्यातील गाव-खेड्यातील पाणी प्रश्न सोडविण्यासाठी मोठ्या धरणासमवेत नदीजोड प्रकल्प, जलपूनर्भरण, जलसंधारण, पाण्याचा पूनर्रवापर व इतर लहान मोठ्या प्रकल्पाना जोड गरजेचं आहे. याबाबत आपण पश्चिमीकडील नद्यांचे समुद्रात जाणाऱ्या पाण्यापैकी 54 टीएमसी पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्याचा निश्चय केला आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले. नागूपरात ३ दिवसीय विदर्भ पाणी परिषदेच्या उद्घाटन समारंभात मुख्यमंत्री बोलत होते.

वैनगंगा-नळगंगा नदीजोड व तापीमुळं पाणी उपलब्ध…

दरम्यान, अनेक वर्षापासून अपूर्ण असलेल्या गोसीखूर्द प्रकल्पाचे 90 टक्के काम आपण पूर्ण केले आहे. वैनगंगा-नळगंगा नदी जोड प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 500 किमीची नदीचे जाळे विदर्भात साकारणार आहे. पाण्याची उपलब्धता यातून आपण करु शकलो, असे मुख्यमंत्री म्हणाले. तसेच तापी खोऱ्यातील पुनर्भरणासाठी आपण नुकताच मध्यप्रदेश समवेत करार केला. या प्रकल्पातून अकोला, बुलढाणा व वाशिममधील खारपाण पट्टा या भागाला चांगला फायदा होईल. तसेच या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणात शेतीला पाणी उपलब्ध होईल, असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र दुष्काळावर मात करेल…

दुसरीकडे तापी खोऱ्यातील जे पाणी गुजरात मार्गे समुद्रात वाहून जाते त्यातील 35 टीएमसी पाणी तापी खोऱ्यातच राहील, असे नियोजन केले आहे. याचबरोबर नळगंगा-वैनगंगा नदीजोड प्रकल्पाद्वारे विदर्भातील अर्वषणग्रस्त भागात पाणी आणत आहोत. या प्रकल्पातून आगामी काळात महाराष्ट्र हा दुष्काळाचा आव्हानावर यशस्वी मात करुन उभा राहिलेला महाराष्ट्र म्हणून ओळखला जाईल. तसेच बळीराजा योजना अंतर्गत 20 हजार गावांचे बदलले चित्र पाहण्यास मिळेल, आणि जमिनीचे क्षारीकरण रोकण्यासाठी पाण्याचा जपून वापर करणे गरजेता आहे, असे आवाहन यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.