MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

मुख्यमंत्री हतबल त्यांची नितीमूल्यं गेली कुठं…? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
सगळीच माणसं पैशांसाठी विकली जात नाही, पण गद्दार पैशांसाठी विकली जातात, निष्ठावंत विकली जात नाहीत, काही जणांना मोठं केले ती गेली, पण ज्यांनी मोठं केले ती निष्ठावंत आजही शिवसेनेसोबत आहेत. असं ठाकरे म्हणाले.
मुख्यमंत्री हतबल त्यांची नितीमूल्यं गेली कुठं…? उद्धव ठाकरेंचा देवेंद्र फडणवीसांना सवाल

Uddhav Thackeray : शेतकरी क्रांती संघटना महाराष्ट्र राज्य संघटनेचे विलीनीकरण शनिवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात झाले. यावेळी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब बिलेवार यांच्यासह राज्य आणि जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांनी ठाकरे सेनेत प्रवेश केला. यावेळी शिवसेना नेते खासदार अरविंद सावंत, शिवसेना प्रवक्त्या जयश्री शेळके, आमदार संजय देरकर, जिल्हाप्रमुख जालिंदर बुधावत तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.

रमी खेळाला ऑलिंपिकचा दर्जा द्या…

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नितिमुल्य समिती स्थापन केली होती ती गेली कुठं, असा सवाल उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना केला. महायुती सरकारची भ्रष्टाचाराची प्रकरणे बाहेर येत असून राज्यभरात आंदोलन करत भ्रष्टाचारामुळे उघड झालेले विद्रुप चेहरा जनतेसमोर आणणार, असा इशारा ठाकरेंनी दिला. जागाचा पोशिंदा बळीराजाचा अवमान करणाऱ्या कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा न घेता खातं बदलले. रमी खेळणाऱ्यांना क्रीडा मंत्री केलं म्हणजे रमीला ऑलिंपिकचा दर्जा मिळणार. आम्ही सत्तेत असताना आरोप करत राजीनाम्याची मागणी करायचे आणि आता खातं बदललं जातं.

शेतकऱ्यांप्रती बेताल वक्तव्य…

पावसाळी अधिवेशनात सभागृहात रमी खेळतानाचा व्हिडिओ वायरल झाला. मला वाटलं मुख्यमंत्री संवेदनशील असून त्यांचा राजीनामा घेतील. उलट फडणवीस यांनी खातं बदलतं कोकाटे यांचे मंत्री पद वाचवले. २०१९ मध्ये मविआचे सरकार सत्तेत आल्यानंतर मला अनपेक्षित मुख्यमंत्री झालो. नागपूरचे हिवाळी अधिवेशन हे पहिलंच होतं. त्यावेळी राज्यातील शेतकरी कर्ज माफी करा या मागणीसाठी माझ्याकडे आले नाही. परंतु शेतकऱ्याप्रती आदर आणि त्यांच्या भावना लक्षात घेता शेतकऱ्यांना कर्ज माफी केली. मात्र आताचे खातं बदल झालेले माजी कृषिमंत्री तर शेतकऱ्यावरच टीका करत होते.

प्रत्येक कामात घोटाळा…

विधानसभा निवडणुकीतील निकाल अनाकलनीय आहे, कोणालाच वाटलं नव्हतं असा निकाल येईल, आता याचे घोटाळे बाहेर पडतातय, लाडक्या बहिणीत किती बापे घुसले कोणी घुसवले, पैसे कुठे गेले याचा हिशेब महायुती सरकारला द्यावाच लागेल. नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशनात विरोधी पक्ष वरचढ ठरला, संसदेतही विरोधी पक्षाने भाजप सरकारला पळो की सळो करुन सोडलं, असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी भाजपवर केला.