महाराष्ट्रातील हवामानात पुन्हा एकदा मोठे बदल पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा तापमानात मोठी घसरण होण्यास सुरूवात झाली आहे. मराठवाडा, विदर्भ, उत्तर आणि पश्चिम महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढताना दिसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये राज्यातील थंडीचे प्रमाण कमी झाले होते. आता मात्र वातावरणात बदल जाणवत असून तापमानात घट होऊन गारठा वाढला आहे. हवामान विभागाकडून देखील थंडीच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच थंडीचा कडाका वाढणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे किमान तापमानामध्ये मोठी घसरण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना मात्र आता आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
थंडीची लाट; तापमानात मोठी घसरण
गेल्या काही दिवसांपासून रात्री वाढलेली थंडी सकाळी जरी जाणवत असली तरी दुपारच्या वेळी तापमान थोडं वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आकाश स्वच्छ, हवा कोरडी आणि ढगांची उपस्थिती कमी राहील. आज राज्यभर हवामानात हलका बदल जाणवणार आहे. गेल्या काही दिवसांपासून रात्री वाढलेली थंडी सकाळी जरी जाणवत असली तरी दुपारच्या वेळी तापमान थोडं वाढण्याची शक्यता आहे. एकूणच आकाश स्वच्छ, हवा कोरडी आणि ढगांची उपस्थिती कमी राहील. कोणत्याही भागात पावसाचा अंदाज नाही. किनारी भागात सकाळचा गारवा जाणवेल, तर उत्तर महाराष्ट्रात थंडी आजही कायम आहे.

मुंबईत आज सकाळी हलका गारवा जाणवेल. कालच्या तुलनेत किमान तापमान किंचित वाढून 18–19°C, तर दिवसा 30–31°C राहील. दुपारी हलकी उब जाणवेल पण दमटपणा तुलनेने कमी राहणार आहे. पालघरमध्ये गारवा अधिक असून सकाळी तापमान 16–17°C, दिवसा 29–30°C नोंदले जाईल. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे सकाळी 17–19°C पर्यंत थंडी जाणवेल, तर दुपारी तापमान 30–32°C राहील. कोकणात हवामान स्वच्छ, स्थिर आणि कोरडे राहण्याची शक्यता आहे. ठाण्यात आज सकाळी गारवा किंचित वाढलेला जाणवेल. किमान तापमान 18°C च्या आसपास, तर दिवसा 30–32°C पर्यंत उब जाणवेल. नवी मुंबईतही सकाळी हलकी थंड हवा राहील आणि दुपारी सामान्य तापमान परत वाढेल. कल्याण–डोंबिवली भागात सकाळचे तापमान 16–17°C, तर दिवसा 29–31°C राहील. या पट्ट्यात हवामान एकूण शांत आणि कोरडे राहील.
पुण्यात अजूनही हुडहुडी भरणारी थंडी जाणवत नाही. पण सकाळचे तापमान 15–17°C असून वातावरण गार पण आरामदायी आहे. दिवसा तापमान 29–31°C पर्यंत जाणार असल्याने दुपारी हलकासा उष्णपणा वाढेल. आकाश स्वच्छ आणि हवेत आर्द्रता कमी असल्याने हवामान कोरडे राहील. उत्तर-मध्य महाराष्ट्र या विभागात आज सकाळी थंडी कालच्या तुलनेत थोडी अधिक जाणवेल. नंदुरबार, जळगाव आणि धुळे जिल्ह्यांत तापमान 11–13°C पर्यंत घसरू शकतं, ज्यामुळे सकाळी गारवा ठळक राहील. दिवसा तापमान 28–30°C चे स्थिर चित्र दिसेल. संभाजीनगर आणि अहिल्यानगर येथे किमान तापमान 12–14°C, सोलापूरात 14–16°C राहील. दुपारी 29–31°C ची सामान्य उब असेल. उत्तर महाराष्ट्रात थंडीची लाट हलकी पण सातत्यपूर्ण आहे.
महाराष्ट्रात थंडीत वाढ; आरोग्य जपा !
दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढण्यास सुरुवात झाली आहे. आगामी काळात तापमानाचा पारा आणखी खाली येऊ शकतो. त्यामुळे नागरिकांना आरोग्याची काळजी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे. कडाक्याच्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. थंड तापमानामुळे सर्दी, खोकला, ताप आणि सांधेदुखी यांसारख्या समस्या वाढू शकतात. त्यामुळे शरीर उबदार राहील अशी कपडे घालणे, गरम पाणी पिणे आणि पौष्टिक आहार घेणे महत्त्वाचे आहे.
सकाळी कोमट पाण्याने अंघोळ करणे, वाफ घेणे आणि घरात पुरेशी हवेशीर व्यवस्था ठेवणे फायदेशीर ठरते. वृद्ध व्यक्ती, लहान मुले आणि अस्थमा किंवा हृदयविकार असलेल्या व्यक्तींनी अतिरिक्त काळजी घ्यावी. व्यायाम करताना शरीरावर थंडीचा परिणाम होऊ नये म्हणून योग्य कपडे वापरावेत. पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणेही आरोग्यासाठी उपयुक्त ठरते.
थंडीत हृदयविकाराचा धोका वाढण्याची शक्यता अधिक असते. कारण, तापमान घटल्यामुळे शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि रक्तदाब वाढतो. अशा परिस्थितीत हृदयावर अतिरिक्त ताण येतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते. विशेषतः मधुमेह, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल वाढणे किंवा आधीपासून हृदयाचे विकार असलेल्या व्यक्तींनी खास काळजी घेणे आवश्यक आहे.











