MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

ठाकरेंवर गंभीर आरोप करणारा वकीलाच्या अडचणी वाढ , कोर्टाने ते कारवाईचे आदेश

Written by:Astha Sutar
Published:
ठाकरेंवर गंभीर आरोप करणारा वकीलाच्या अडचणी वाढ , कोर्टाने ते कारवाईचे आदेश

मुंबई :  दिशा सालियन प्रकरणात दिशाने आत्महत्ये केली नव्हती तर तिची हत्या झाल्याचा आरोप तिचे वडील सतीश सालियान यांनी केला होता. या प्रकरणी त्यांनी वकील नीलेश ओझा यांच्यामार्फेत कोर्टात याचिका देखील दाखल केली होती. या याचिकेतून आदित्य ठाकरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. मात्र, नीलेश ओझा यांच्यावर कोर्टाने आत्ता मोठी अॅक्शन घेतली आहे. कोर्टाने नीलेश ओझा यांना कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी दोषी ठरवले आहे. तसेच ते कारवाईला पात्र असल्याचा निकाल दिला आहे.

नीलेश ओझा यांनी एक एप्रिलला घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये न्यायलयाची बदनामी करणारी वक्तव्ये केली होती. तसेच दिशा सालियन प्रकरणातील न्यायाधीस रेवती मोहिते डेरे यांचे नाव घेत त्यांच्यावर वैयक्तिक टीका करत त्यांची बदनामी केली होती. त्यामुळे  मुंबई हायकोर्टात पाच न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर नीलेश ओझा यांनी अवमानस्पद केल्या वक्तव्यांवर सुनावणी झाली

या सुनावीमध्ये ओझा यांनी न्यायालयाविषयी केलेल्या वक्तव्यांची व्हिडिओ क्लिप न्यायाधीसांना ऐकवण्यात आली. ही क्लिप ऐकुण न्यायाधीस संतप्त झाले. ओझा यांनी न्यायालयाचा अवमान केल्याचे स्पष्ट दिसत असल्याचे न्यायाशीधांनी म्हणत ते कारवाईस पात्र असून त्यांच्यावर कारवाईचे आदेश दिले.

तो व्हिडिओ हटवा

नीलेश ओझा याने न्यायालयाचा अवमान करणारी वक्तवे पत्रकार परिषदेमध्ये केली होती. ते व्हिडिओ न्यूज चॅनल आणि चॅनलवर प्रसारित करण्यात आली होती. ती वक्तवे तेथून काढण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. ओझा यांना खडसावत त्यांच्या वक्तव्याची गंभीर दखल न्यायालयाने घेतली.

ओझा काय म्हणाले?

ओझा म्हणाले न्यायालयाचा आदेश परत घेण्यासाठी रिकाॅल ऑफ ऑर्डरचा अर्ज करणार आहे. न्यायालयाने सांगितले की त्यांनी जे आरोप न्यायालयाच्या बाहेर केले ते आरोप त्यांनी संबंधित न्यायाधीसांच्या समोर करत आपली बाजु मांडायला हवी होती.