Crime News: विवाहबाह्य संबंधांच्या संशयामुळे घात; पुणे जिल्ह्यातील भिगवणमध्ये पतीकडून गर्भवती पत्नीची हत्या

Rohit Shinde
आजच्या समाजात वाढते अनैतिक संबंध आणि वैवाहिक जीवनातील अविश्वास ही गंभीर सामाजिक समस्या बनली आहे. पती-पत्नीतील संवादाचा अभाव, मानसिक तणाव, आणि बाह्य आकर्षण यामुळे अनेकदा नात्यांमध्ये तडे जातात. संशय, मत्सर आणि राग या भावना अनियंत्रित झाल्यास त्या गुन्हेगारी स्वरूप धारण करतात. अशीच एक धक्कादायक घटना पुणे जिल्ह्यातील भिगवणध्ये उघडकीस आली आहे.

संशयामुळे पतीकडून गर्भवती पत्नीची हत्या

पुणे जिल्ह्यातील भिगवण येथून एक धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे, जिथे विवाहबाह्य संबंधाच्या संशयावरून पतीने आपल्या पत्नीची हत्या केली. आरोपीचे नाव  रविराज रणजीत जाधव असे आहे, जो बारामती तालुक्यातील कटफळ येथील रहिवासी आहे. २२ ऑक्टोबर रोजी स्थानिक पोलीस पाटील यांना मदनवाडी येथील एका पुलाखाली संशयास्पद काळी ब्लँकेट असल्याची माहिती मिळाल्यानंतर ही घटना उघडकीस आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुदर्शनने त्याची गर्भवती पत्नी दीपाली सुदर्शन जाधव हिच्या डोक्यावर लोखंडी रॉडने वार केल्याने तिचा जागीच मृत्यू झाला.

प्रकरण लपवण्यासाठी सुदर्शनने मृतदेह ब्लँकेटमध्ये गुंडाळला आणि भिगवण-बारामती रस्त्यावरील मदनवाडी गावाजवळील एका पुलाखाली फेकून दिला. तपासादरम्यान, पोलिसांना अंदाजे ३०-३५ वर्षांच्या महिलेचा कुजलेला मृतदेह आढळला, ज्याच्या डोक्यावर जखमा होत्या आणि तिच्या हातावर “रविराज” नावाचा टॅटू होता. भिगवण पोलिस ठाण्यात खुनाच्या कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. व पुढील तपास सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले.

पती-पत्नीच्या नात्यांमध्ये वाढता अविश्वास

अनेक ठिकाणी संशयाच्या आधारावर खून, अत्याचार किंवा आत्महत्येच्या घटना घडताना दिसतात. या सर्व घटनांमुळे कौटुंबिक जीवन विस्कळीत होत असून समाजात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे परस्पर विश्वास, संवाद आणि संयम राखणे अत्यावश्यक आहे, जेणेकरून नात्यांतील सौहार्द टिकून राहील आणि गुन्ह्यांचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे धावत्या आयुष्यात पती-पत्नीच्या नात्यावर आता संशयाचे भूत स्वार होत असल्याचे चित्र सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहे.

ताज्या बातम्या