बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळामुळे दक्षिणेत पावसाची स्थिती; महाराष्ट्रात थंडी वाढणार की पाऊस कोसळणार ?

Rohit Shinde

आता पुन्हा एकदा मोठी बातमी समोर येत आहे. चक्रीवादळ सेन्यारनंतर पुन्हा एकदा एक नवं चक्रीवादळ बंगालच्या उपसागरात तयार झालं आहे. या चक्री – वादळाला डिटवाह असं नाव देण्यात आलं आहे. खरंतर या चक्रीवादळामुळे दक्षिणेतील राज्यांमध्ये पुन्हा एकदा पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार हे बंगालच्या उपसागरात निर्माण झालेलं चक्रीवादळ तीस नोव्हेंबरपर्यंत तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यावर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यामुळे दक्षिणेतील या भागात पावसाची शक्यता निर्माण झालेली आहे. अशा परिस्थितीत मध्य आणि उत्तर भारतात मात्र पुन्हा थंडीचा कडाका वाढत जाणार आहे. महाराष्ट्रातील हवामानाची स्थिती या काळात नेमकी कशी असणार आहे. ते जाणून घेऊ…

महाराष्ट्रातील हवामान कसे राहणार ?

दरम्यान दुसरीकडे उत्तर भारतात मात्र थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता आहे, मध्य भारतात देखील थंडी वाढण्याची शक्यता आहे, महाराष्ट्रात हवामान विभागाकडून कोणताही पावसाचा इशारा देण्यात आलेला नाही, मात्र सरासरी तापमानाता घट होऊन पठारी प्रदेशात थंडीची लाट पहायला मिळू शकते असा अंदाज आहे. त्यामुळे एकूणच या काळात विदर्भ, मराठवाडा, तसेच पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात थंडीची लाट पाहायला मिळेल. थंडीचा कडाका चांगलाच वाढण्याची शक्यता निर्माण झालेली आहे.

पण, थंडीचा जोर पुन्हा वाढणार 

आठ दिवसांसाठी थंडीचा जोर कमी होणार असून, नागरिकांना गारठ्यापासून थोडा दिलासा मिळणार आहे. हवामान शास्त्रज्ञांच्या मते, सध्या बंगालच्या उपसागरात जे वादळ तयार होत आहे, त्याचा थेट परिणाम स्थानिक हवामानावर दिसून येत आहे. या बदलामुळे उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्याचा वेग मंदावला आहे, तर त्याऐवजी बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या उष्ण हवेचा प्रवाह वाढला आहे. याचसोबत हवेतील आर्द्रतेतही वाढ झाली आहे. त्यामुळे, आता नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत हीच स्थिती कायम राहण्याची शक्यता असून, थंडीचा कडाका कमी राहील.

परंतु एकूणच ही स्थिती कायम राहणार नसून डिसेंबर महिन्याच्या सुरूवातीपासून राज्यातील तापमानात मोठी घट होणार आहे. तापमान 9 ते 10 अशांपर्यंत खाली घसरण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. सध्याची ही स्थिती तात्पुरती आहे. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत नागरिकांना थंडीपासून दिलासा मिळेल, परंतु डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून थंडीचा जोर पुन्हा वाढेल. वादळी हवामान स्थिर झाल्यानंतर उत्तरेकडील थंड वाऱ्यांचे प्रवाह पुन्हा सुरू होतील आणि तेव्हा खऱ्या अर्थाने कडाक्याची थंडी अनुभवायला मिळेल.

नागरिकांनो, आरोग्याची काळजी घ्या !

वाढणाऱ्या थंडीत आरोग्याची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तापमान कमी झाल्याने सर्दी, खोकला, दमा, सांधेदुखी यांसारख्या तक्रारी वाढू शकतात. शरीराचे तापमान संतुलित ठेवण्यासाठी उबदार कपडे, मोजे, हातमोजे आणि टोपी वापरणे फायदेशीर ठरते. गरम पाणी पिणे, हळदीचे दूध किंवा सूपसारखे ऊब देणारे पदार्थ सेवन करणे प्रतिकारशक्ती वाढवते. घरात वायुविजन ठेवणे आणि घराबाहेर जाताना मास्कचा वापर करणे संक्रमणापासून संरक्षण देते. व्यायाम, पुरेशी झोप आणि पौष्टिक आहार या गोष्टी थंडीत शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

ताज्या बातम्या