आश्चर्य! काँग्रेसच्या प्रचारासाठी थेट गौतमी पाटील मैदानात; चंद्रपुरातील प्रचार रॅलीत काय घडलं ?

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आज काँग्रेसची प्रचारसभा आकर्षक ठरली. कारण या प्रचारसभेत चक्क डान्सर गौतमी पाटील प्रचार करताना बघायला मिळाली.

नृत्यांगणा गौतमी पाटीलची महाराष्ट्रातील जनमाणसांत असणारी क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. तिच्या लावण्यशैलीतील नृत्याविष्कार, मंचावरची ऊर्जा आणि प्रेक्षकांशी जुळणारा संवाद यामुळे ती ग्रामीण तसेच शहरी भागांत लोकप्रिय झाली आहे. विशेषतः तमाशा आणि लोकनृत्याच्या माध्यमातून तिने तरुणांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांना भुरळ घातली आहे. मात्र, हीच गौतमी पाटील जेव्हा प्रचाराच्या मैदानात उतरते, तेव्हा नेमकी काय स्थिती निर्माण होत असेल? चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आज काँग्रेसची प्रचारसभा आकर्षक ठरली. कारण या प्रचारसभेत चक्क डान्सर गौतमी पाटील प्रचार करताना बघायला मिळाली.

काँग्रेसच्या प्रचार रॅलीत गौतमीची हजेरी

चंद्रपूर जिल्ह्यातील मूल शहरात आज काँग्रेसची प्रचारसभा आकर्षक ठरली. कारण या प्रचारसभेत चक्क डान्सर गौतमी पाटील प्रचार करताना बघायला मिळाली. त्यामुळे या प्रचारसभेला मोठी गर्दी झालेली बघायला मिळाली. गौतमी पाटील हिचे राज्यात लाखो चाहते आहेत. त्यामुळे गौतमी पाटील प्रचार करताना दिसली तर तिच्या प्रचाराभोवती गर्दी होणं ही साहजिच आहे. चंद्रपूरच्या मूल शहरात आज अनेक जण गौतमी पाटील हिला काँग्रेसचा प्रचार करताना पाहून आश्चर्यचकीत झाले. सेलेब्रेटींच्या माध्यमातून याआधीदेखील प्रचार झाले आहेत.

गौतमी पाटील हिने मूल शहरात काँग्रेसच्या उमेदवार एकता समर्थ यांच्या प्रचारासाठी रोड शो केला. एका उघड्या जीपमधून गौतमी पाटील हिच्यासोबत काँग्रेसच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार आणि नगरसेवक पदाचे नगरसेवक यांनी रोड शो केला. यावेळी गौतमी पाटील हिने मतदारांना काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं. गौतमी नाकात नथणी आणि गळ्यात काँग्रेसचा गमछा परिधान करुन प्रचारात सहभागी झाली होती. मूलमधील दुर्गा माता मंदिरपासून तिचा रोड शो निघाला होता. यावेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार शक्तीप्रदर्शन करण्यात आलं.

गौतमी पाटीलमुळे बघ्यांची मोठी गर्दी

काँग्रेसकडून भाजपचा पराभव करण्यासाठी वेगवेगळ्याप्रकारे मतदारांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने निवडणुकीच्या प्रचारात थेट गौतमी पाटील हिला उतरवलं आहे. गौतमी पाटील हिच्या रोड शोला मूल शहरात चांगला प्रतिसाद देखील मिळताना बघायला मिळालं आहे. गौतमी पाटील हिने सर्वांना हात दाखवत काँग्रेसला मतदान करण्याचं आवाहन केलं. यावेळी रोड शोमध्ये मोठी गर्दी जमा झाली होती. गौतमीने यावेळी तिच्या चाहत्यांसोबत फोटोदेखील काढले. गौतमी प्रचारात सहभागी झाल्याने रोड शो दरम्यान सर्वत्र उत्साहाचे आणि आनंदी वातावरण बघायला मिळाले. त्यामुळे एकुणच या घटनेमुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News