Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver : राज्यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा मागील अनेक महिन्यापासून चर्चेत आहे. मागच्या आठवड्यातच सरकारने 30 जून 2026 पर्यंत शेतकरी कर्जमाफी करू असं आश्वासन दिले आहे. त्यासाठी एक समितीही गठीत करण्यात आली आहे. परंतु खरोखरच शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल का? याबाबत अजूनही काही जणांना शंका आहे. त्यातच आता खुद्द राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकरी कर्जमाफी बद्दल एक महत्त्वाचे विधान केलं आहे. कर्जमाफी महत्वाचीच आहे. पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाहीये. अंतिम उत्तर हे शेतीमध्ये शाश्वतता आणणे असे फडणवीस यांनी म्हटले.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver)
आमचे सरकार असताना शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी केली होती. या सरकारनेही करावी अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली आहे याबाबत देवेंद्र फडणवीस याना आज प्रसारमाध्यमांनी विचारलं असता, ते म्हणाले, आपण प्रत्येकवेळी सांगितले आहे की, कर्जमाफी महत्वाचीच आहे. पण कर्जमाफी हे अंतिम उत्तर नाहीये. अंतिम उत्तर हे शेतीमध्ये शाश्वतता आणणे हे आहे. त्याकरिता शेती फायद्याची झाली पाहिजे. उत्पादनाचा जो काही खर्च आहे तो कमी झाला पाहिजे. उत्पादकता वाढवणे हाच यावरील उपाय आहे असे फडणवीस यांनी म्हंटल. Devendra Fadnavis On Farmers Loan Waiver

नवीन शेती पद्धतीचा अवलंब करावा लागेल
देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, आपल्याला नवीन शेती पद्धत लागेल. शेतीच्या नवीन टेक्निक आपल्याला वापराव्या लागतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याला जे मिशन दिले आहे, नैसर्गिक शेतीचे त्यानुसार आपल्याला राज्यातील 25 हजार हेक्टर शेती नैसर्गिक शेतीखाली आणायची आहे. मी बियाणांच्या कंपन्यांना . मी बियाणांच्या कंपन्यांना तशा प्रकारची विनंती केली आहे अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली