बोनसच्या ‘गुड न्यूज’ने म्हाडा कर्मचारी आनंदात आहेत. कारण, दिवाळीच्या साधारण एका महिन्याच्या आधीच्याच पगारामध्ये केंद्र शासनाने कर्मचाऱ्यांना बोनस स्वरुपात देण्यासाठी एका मोठ्या निधीला मंजुरी दिली आहे. खरंतर दिवाळीच्या दिवसांमध्ये खासगी अथवा सार्वजिक क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांमध्ये बोनस हा नेहमीच चर्चेचा विषय असतो. अशा परिस्थितीत म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी मोठी गुडन्यूज समोर आली आहे.
म्हाडाच्या कर्मचाऱ्यांसाठी बोनस जाहीर
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण अर्थात ‘म्हाडा’च्या कर्मचाऱ्यांना सुद्धा बोनसची घोषणा करण्यात आली आहे. म्हाडाने आपल्या कर्मचाऱ्यांना 25000 रुपये दिवाळीचा बोनस जाहीर केला आहे. 2024 मध्ये अर्थात गेल्या वर्षी म्हाडाच्या कर्मचाऱ्यांना 23000 रुपये बोनस देण्यात आला होता. यंदा मात्र, कर्मचाऱ्यांना 2,000 रुपयांनी दिवाळी बोनसमध्ये वाढ करून त्यांना देण्यात येणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये दिवाळीच्या आधीच आनंदाचे वातावरण पाहायाल मिळत आहे.

म्हाडाच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड
दिवाळी सण जेमतेम महिनाभरावर येऊन ठेपला आहे. दरवर्षी प्रमाणे, यंदाही म्हाडा कर्मचाऱ्यांच्या आनंदात भर पडली आहे. म्हाडाने आपल्या कर्मचाऱ्यांना दिवाळी बोनस देण्याचे जाहीर केल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान, दिवाळी बोनसचा प्रस्ताव म्हाडाच्या बैठकीत कर्मचारी संघटनांनी मांडला होता. अधिकाऱ्यांनी चर्चेनंतर हा प्रस्ताव सर्वानुमते मंजूर केला. निर्णयामुळे कर्मचारी व अधिकाऱ्यांमध्ये आनंदाची लाट आली आहे.











