तुळजापूरची तुळजाभवानी देवी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पूजनीय आणि प्रसिद्ध देवी मानली जाते. तुळजाभवानी देवीचे मंदिर उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर येथे स्थित आहे. ही देवी महाराष्ट्राची कुलदैवत मानली जाते आणि विशेषतः छत्रपती शिवाजी महाराजांची आराध्य देवी म्हणून ओळखली जाते. आई तुळजाभवानीच्या दर्शनाला महाराष्ट्रासह, तेलंगणा, कर्नाटक, आंध्रप्रदेश भागातून भाविक मोठ्या संख्येने येत असतात. मात्र, गेल्या काही महिन्यांत तुळजाभवानीच्या देणगीत अचानक घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. नेमके यामागचे कारण काय आहे? ते सविस्तर जाणून घेऊ…
आई तुळजाभवानीच्या देणगीमध्ये घट
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी जास्त गर्दी केली नाही. नवरात्रीच्या दरम्यान राज्यामध्ये अवकाळी पाऊस सुरू होता. या पाऊसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांचे संसार उघड्यावर येऊन पडले. अनेक शेतकऱ्यांच्या जमीनी उघड्यावर पडल्या, अनेकांचे अख्खे संसार पावसाच्या पाण्यात वाहून गेले. अतिवृष्टीमुळे अनेक भाविकांना तुळजापूर गाठता आले नाही. शिवाय, पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांना देवीला देणगी देता आली नाही. यासोबतच देणगी दर्शनाच्या वाढलेल्या दरांमुळे यंदा तुळजाभवानी देवस्थानच्या उत्पन्नात गतवर्षीच्या तुलनेत 34 लाखांहून अधिकची घट झाली आहे.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या तुळजापूरच्या तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी यंदाच्या वर्षी अवकाळी पावसामुळे जास्त गर्दी केली नाही. अतिवृष्टीमुळे अनेक भाविकांना तुळजापूर गाठता आले नाही. शिवाय, पावसामुळे झालेल्या नुकसानामुळे अनेक शेतकऱ्यांना देवीला देणगी देता आली नाही.
दर्शन महागलं; भक्तांनी पाठ फिरवली?
दरवर्षी नवरात्री ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंत साधारणतः 70 लाखांहून अधिक भाविकांची मंदिरात हजेरी लागते. गेल्या वर्षीच्या नवरात्री ते कोजागिरी पौर्णिमेपर्यंतच्या उत्सवाच्या काळात 15 दिवसात 6 कोटी 1 लाख 42 हजार रूपयांचे उत्पन्न देवस्थानाला मिळाले होते. यंदा हाच उत्सव कालावधी 17 दिवसांचा असतानाही 5 कोटी 66 लाख 94 हजार रूपयांचे उत्पन्न मिळाले. मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असल्याने यंदा पेड दर्शनाचे दर वाढविण्यात आले होते. 200 रूपयांचा पास 300 रुपये, 500 रुपयांचा 1 हजार रुपये, रेफरल पास 200 रुपयांचे 500 रुपयांना करण्यात आले होते. यामुळे दर्शनातून मिळणाऱ्या देणगीच्या उत्पन्नामध्ये जवळपास 41 लाखांनी कमी झाली आहे. त्यामुळे अनेक शुल्कांत आणि दर्शन पासांच्या रक्कमेत झालेली वाढ देखील देणगी घटण्यास कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.