MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

विषारी पिल्लावळ वाढवली, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत, गिरीश महाजनांच्या सीडीबाबत काय म्हणाले?

Written by:Smita Gangurde
Published:
दिवसेंदिवस खडसे विरुद्ध महाजन हा वाद इतका तीव्र होत चाललाय की तो कुटुंबिक पातळीवर येऊन ठेपलाय. त्यामुळं भविष्यात आणखी काय काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय
विषारी पिल्लावळ वाढवली, एकनाथ खडसेंनी व्यक्त केली खंत, गिरीश महाजनांच्या सीडीबाबत काय म्हणाले?

जळगाव– ड्रग्ज पार्टीप्रकरणात एकनाथ खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर पुरते अडकलेत. या कारवाईवरुन थेट मंत्री गिरीश महाजनांकडे बोट दाखवलं जातंय. त्यामुळं एकनाथ खडसे विरुद्ध गिरीश महाजन हा संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होतोय

त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसेंनी प्रथमच भाष्य केलंय. या राजकारणामुळे मलाही वेदना होताय हे सर्व आता थांबायला पाहिजे असं रक्षा खडसेंनी बोलून दाखवलं
तर आरोप करताना तारतम्य पाळायला पाहिजे असं वक्तव्य करत शरद पवारांनी भाजपाला सुनावलंय. जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या राजकारणामुळे मला देखील वेदना होत आहेत हे सर्व आता थांबायला पाहिजे. जिल्ह्यातील कोणताही नेता असेल त्याने विकासाला प्राधान्य दिले पाहिजे, इतर गोष्टी सोडून विकासावर बोलले पाहिजे. त्यामुळे जिल्ह्याचा विकास होईल असं रक्षा खडसे म्हणाल्यात.

महाजनांच्या सीडी लोढांकडे- खडसे

जावई प्रांजल खेवलकरप्रकरणी एकनाथ खडसेंनी पुन्हा एकदा गिरीश महाजनांवर निशाणा साधलाय. प्रफुल लोढा प्रकरणाबाबत आमचे तोंड बंद करण्यासाठी हे षडयंत्र रचल्याचा आरोप खडसेंनी पुन्हा एकदा केलाय. गिरीश महाजनांच्या अनेक सीडी लोढांकडे असल्याचा दावा खडसेंनी करत मागे हटणार नसल्याचा इशारा दिलाय

प्रांजल खेवलकरच्या मोबाईलच्या हिडन फोल्डरमध्ये मुलींचे 1497 नग्न, अर्धनग्न फोटो सापडलेत. खेवलकरच्या या काळ्या कारनाम्यांचा पर्दाफाश राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकरांनी केला. मात्र तपास पोलीस नव्हे तर रूपाली चाकणकर करत असल्याची टीका एकनाथ खडसेंनी केली होती. त्यामुळं रूपाली चाकणकरांच्या समर्थनार्थ रावेर मधील भाजपाचे कार्यकर्ते मैदानात उतरले
या भाजप कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांचा जोरदार निषेध केला

विषारी पिल्लावळ वाढवली- खडसे

आपण रूपाली चाकणकर यांचा अनादर केलेल्या नाही अशी प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. ज्या कार्यकर्त्यांना मी मोठे केले तेच कार्यकर्ते माझ्या विरोधात आज आंदोलन करत आहेत, विषारी पिलावळ मी वाढवली याचं दुःख मला आहे.

जळगावचं राजकारण कुठे जाणार?

जळगावच्या राजकारणात एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन कधीकाळी गुरुशिष्य ओळखले जायचे. आता या दोघा नेत्यांमधून विस्तवही जात नाहीय. दिवसेंदिवस खडसे विरुद्ध महाजन हा वाद इतका तीव्र होत चाललाय की तो कुटुंबिक पातळीवर येऊन ठेपलाय. त्यामुळं भविष्यात आणखी काय काय होणार हा प्रश्न उपस्थित होतोय