Dasara Melava: राज्यात आज दसरा मेळाव्यांची रेलचेल; भाषणात कोण-काय बोलणार? वेळ आणि ठिकाण जाणून घ्या!

Rohit Shinde

आज आज पाच महत्वाचे दसरा मेळावे संपन्न होत आहेत. सकाळीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव पार पडला. त्यानंतर आता उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मनोज-जरांगे पाटील आणि पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. त्यामुळे या मेळाव्यांबाबत सविस्तर जाणून घेऊ…

मनोज जरांगेंचा दसरा मेळावा (Manoj jarange dasara melava)

नारायण गडावर मनोज जरांगे पाटील यांचा आज दसरा मेळावा होणार आहे, मनोज जरांगे रुग्णालयात असल्याने ॲम्बुलन्सने नारायण गडाकडे रवाना होतील. सकाळी 11 वाजेपर्यंत नारायण गडाच्या पायथ्याशी जरांगे पाटील दाखल होतील. गडावर दर्शन घेतल्यानंतर महंत शिवाजी महाराजांसोबत जरांगे पाटील मुख्य व्यासपीठावर पोहचतील. दुपारी 12 वाजताच्या दरम्यान मनोज जरांगे पाटील उपस्थितांना संबोधित करणार असल्याची माहिती समोर येत आहे.

पंकजा मुंडेंचा दसरा मेळावा (Pankaja munde dasara melava)

मंत्री पंकजा मुंडे हेलिकॉप्टरने सकाळी 11 वाजता सावरगाव घाट येथे दाखल होतील. त्यानंतर राष्ट्रसंत भगवान बाबा यांच्या मंदिरात जाऊन त्या दर्शन घेतील. आणि भगवान बाबा यांच्या मूर्तीची पूजा आणि आरती करतील. साधारण 12 वाजता पंकजा मुंडे संबोधित करतील. धनंजय मुंडे आणि लक्ष्मण हाकेही पंकजा मुंडेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थिती लावणार आहेत. लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या विचारांची परंपरा पुढे नेणाऱ्या पंकजा मुंडे यांचे मार्गदर्शन ऐकण्यासाठी आणि सीमोल्लंघन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय या ठिकाणी दाखल होतो.

एकनाथ शिंदेंचा दसरा मेळावा (Eknath shinde dasara melava)

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेदेखील आपला दसरा मेळावा आयोजित करतात. आपल्या दसरा मेळाव्यात ते शिवसैनिकांना संबोधित करतात. या वर्षी त्यांचा दसरा मेळावा मुंबईतील आझाद मैदानावर होणार होता. आता मात्र त्यांच्या मेळाव्याचे ठिकाण बदलण्यात आले असून तो यंदा आझाद मैदानाऐवजी नेस्को सेंटरमध्ये होणार आहे. केवळ एमएमआर क्षेत्रातील शिवसैनिकांसाठी नेस्को येथे दसरा मेळावा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्याप्रमाणेच एकनाथ शिंदे हेदेकील रात्री सात ते नऊ वाजेच्या दरम्यान दसरा मेळाव्यासाठी आलेल्यांना संबोधित करत असतात.

उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा (Uddhav thackeray dasara melava)

दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानावरच होणार आहे. रात्री 8 वाजता उद्धव ठाकरे उपस्थितांना संबोधित करतील, अशी शक्यता आहे. यंदाचा दसरा मेळावा अनेक अर्थांनी वेगळा ठरण्याची शक्यता आहे. कारण या मंचावर मनसेचे प्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याची शक्यता आहे. दोन्ही नेते युतीचीही घोषणा करू शकतात, असे सांगितले जात आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्यानिमित्त 2 ऑक्टोबर रोजी आपल्या भाषणात काय बोलणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

ताज्या बातम्या