MP Breaking News
Wed, Dec 17, 2025

गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल, प्रवास करताना बदल जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा जल्लोष अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतील...
गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा उत्साह; मुंबईतील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल, प्रवास करताना बदल जाणून घ्या!

मुंबईतील गोकुळाष्टमी आणि दहीहंडी हा उत्साह, रंगत आणि एकोप्याचा सण आहे. कृष्णजन्माच्या निमित्ताने गोविंदा पथके मानवी मनोरे रचून दहीहंडी फोडतात. शहरातील रस्ते, चौक आनंदाने गजबजतात. हा सण खेळ, श्रद्धा आणि मैत्रीचे सुंदर प्रतीक मानला जातो. या सणांच्या पार्श्वभूमीवर मुंबई शहर आणि उपनगरांतील वाहतूक व्यवस्थेमध्ये मोठा बदल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे प्रवास करताना आधी वाहतूक व्यवस्थेतील बदल जाणून घेणे अत्यंत महत्वाचे ठरते.

गोकुळाष्टमी, दहीहंडीमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल

गोकुळाष्टमी सण अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला असून, राज्यभरात जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. दहीहंडी या मुख्य आकर्षणाच्या पार्श्वभूमीवर, मुंबईत विविध ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेता वाहतूक पोलिसांनी विशेष उपाययोजना केल्या आहेत. मुंबईतील विलेपार्ले (पश्चिम) येथील हरे राम हरे कृष्ण मंदिर (इस्कॉन) परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमा होण्याची शक्यता असल्यामुळे, सांताक्रूझ वाहतूक विभागाच्या हद्दीत वाहतुकीत खालीलप्रमाणे बदल करण्यात आले आहेत. दरम्यान १५ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:०० वाजल्यापासून ते १६ ऑगस्ट रोजी पहाटे २:०० वाजेपर्यंतत, १६ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४:३० वाजल्यापासून ते १७ ऑगस्ट रोजी पहाटे २:०० वाजेपर्यंत बंद करण्यात आले आहेत.

नो पार्किंग झोन घोषित केलेली ठिकाणे:

जनार्दन म्हात्रे रोड,मुक्तेश्वर देवालय मार्ग,जुहू चर्च रोड,गांधीग्राम रोड,अल्फ्रेड क्रीयाडो रोड,संत ज्ञानेश्वर मार्ग,श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड क्र. १३), बलराज साहनी रोड,ए.बी. नायर रोड, देवळे रोड (मिलिटरी रोड)

प्रवेशबंदी लागू असलेले मार्ग:

चांडोक चौक ते मुक्तेश्वर देवालय मार्ग (उत्तर ते दक्षिण):

फक्त आपत्कालीन सेवा, व्हीव्हीआयपी वाहने, मंदिर पासधारक आणि स्थानिक रहिवाशांना प्रवेश.

अल्फ्रेड क्रीयाडो रोड ते मुक्तेश्वर देवालय मार्ग (दक्षिण ते उत्तर)

सर्वसामान्य वाहनांसाठी बंद.

श्यामराव परुळेकर मार्ग (एन.एस. रोड क्र. १३) ते संत ज्ञानेश्वर मार्ग:

संत ज्ञानेश्वर मार्ग ते देवळे रोड जंक्शन (पूर्व ते पश्चिम):

एकमार्गी वाहतूक व्यवस्था:

मुक्तेश्वर देवालय मार्ग व देवळे रोड जंक्शन ते जेव्हीपीडी जंक्शन (पश्चिम ते पूर्व)

एकमार्गी वाहतूक

संत ज्ञानेश्वर मार्ग ते मुक्तेश्वर देवालय मार्ग

 

पोलीस यंत्रणेला सहकार्य करण्याचे आवाहन

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी नागरिकांनी वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे मुंबई पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे. गोकुळाष्टमी आणि दहीहंडीचा जल्लोष अनुभवण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरतील, याची दाट शक्यता आहे. त्यामुळे सुरक्षितता आणि वाहतूक व्यवस्थेचा समतोल राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून, नागरिकांनी सहकार्य करून सण शांततेत आणि आनंदात साजरा करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.