धक्कादायक! नांदेड-मेडचल रेल्वेत आग; शॉर्टसर्कीटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती

नांदेड-मेडचल रेल्वे गाडीच्या एका बोगीत शॉर्ट सर्कीटमुळे आग लागल्याची घटना समोर आली आहे. प्रवासी सुरक्षित असल्याची माहिती समोर येत आहे.

भारतीय रेल्वे ही प्रवाशांसाठी वरदान, सुरक्षित आणि किफायतशीर प्रवासासाठी रेल्वे ओळखली जाते. मात्र गेल्या काही वर्षात रेल्वेचे वाढलेले अपघात, आगीच्या घटना चिंता वाढवणाऱ्या आहेत. आज सकाळी नांदेड- मेडचल  (तेलंगणा) रेल्वे गाडीतही आगीची धक्कादायक घटना घडली.

नांदेड –  मेडचल रेल्वेत भीषण आग

सोमवारी सकाळी नांदेड ते मेडचल रेल्वे गाडीला आग लागली आहे. शौचालय जवळ असलेल्या कचऱ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. वेळीच आग लागल्याचं लक्षात आल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. आग विझवल्यानंतर गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे.  यामध्ये प्रवाशांच्या जीवाला कोणताही धोका झाला नसल्याची माहिती समोर येत आहे.

रेल्वेचा प्रवास धोकादायक होतोय?

भारतात रेल्वेचे वाढते अपघात आणि आगीच्या घटना हा खरोखरच गंभीर आणि चिंताजनक विषय बनला आहे. देशभरात प्रवासासाठी सर्वाधिक वापरले जाणारे हे वाहतूक माध्यम आता प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक ठरत आहे. अनेक ठिकाणी रेल्वे डब्यांना लागलेल्या आगीच्या घटना, तांत्रिक बिघाड, सिग्नलिंग प्रणालीतील त्रुटी आणि मानवी निष्काळजीपणामुळे झालेल्या दुर्घटनांनी जनतेत भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.

रेल्वे प्रशासनाने अत्याधुनिक तंत्रज्ञान, आग नियंत्रण यंत्रणा, आणि सुरक्षाव्यवस्थेत सुधारणा करण्याची गरज आहे. तसेच गाड्यांची नियमित तपासणी, कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि प्रवाशांना सुरक्षा नियमांची जाणीव करून देणे अत्यंत आवश्यक आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News