महाराष्ट्रात सध्या मुंबई, पुण्याच्या पाठोपाठ सोलापूर विमानतळ चांगलेच नावारूपाला येताना दिसत आहे. अशा परिस्थितीत आता नागपूर विमानतळावरील सेवा मात्र चांगलीच विस्कळीत झाल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रवाशांमध्ये मात्र सध्या प्रचंड अशी संतापाची लाट सध्या पाहायला मिळत आहे. नागपूर विमानतळ प्रशासन आणि विमान कंपन्यांच्या भोंगळ कारभारामुळे विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अनंत अडचणींचा सामना करावा लागत असल्याची बाब समोर आली आहे.
नागपूर विमानतळावर विमानसेवा विस्कळीत
चेक-इन सिस्टीममध्ये बिघाड झाल्यामुळे नागपूर विमानतळावर गोंधळ निर्माण झाला. ७ उड्डाणे रद्द, ४ उशिरा. प्रवाशांना लांब रांगा आणि मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार नागपूर विमानतळावर चेक-इन सिस्टीममध्ये बिघाड झाल्याने बुधवारी देशभरातील हवाई सेवा विस्कळीत झाली. नागपूर विमानतळावर येणारी सात उड्डाणे रद्द करण्यात आली आणि चार उशिरा झाली.

वृत्तांनुसार, या बिघाडामुळे प्रवाशांना मोठी गैरसोय सहन करावी लागली. इंडिगो काउंटरवर आणि विमानतळावर गर्दी दिसून आली. एक ते दीड तासाचा प्रवास अनेक तासांमध्ये बदलला. इंडिगो एअरलाइन्सने नागपूरसह देशभरात झालेल्या व्यत्ययाबद्दल माफी मागितली आहे. एअरलाइनने या संदर्भात एक निवेदन जारी केले आहे. त्यात म्हटले आहे की, “गेल्या दोन दिवसांत नेटवर्कवरील इंडिगो विमान सेवांवर गंभीर परिणाम झाला आहे हे आम्हाला मान्य आहे. प्रवाशांना झालेल्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत.”
भोंगळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये संताप
इंडिगोने म्हटले आहे की अनपेक्षित ऑपरेशनल अडचणी, किरकोळ तांत्रिक बिघाड, हिवाळ्याशी संबंधित वेळापत्रकात बदल, खराब हवामान, विमान वाहतूक व्यवस्थेत वाढलेली गर्दी आणि बदललेले क्रू रोस्टरिंग नियम यामुळे हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नागपूर विमानतळावरील या भोंगळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये मात्र संतापाची लाट पाहायला मिळत आहे. अनेक तक्रारी करून देखील विमान कंपन्यांकडून हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.











