MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

मंडळांना मोफत शाडू माती वाटप, पर्यावरणपूरक मूर्तींसाठी ९९३ मूर्तिकारांना मंडप उभारण्यास पालिकेकडून मंजुरी

Written by:Astha Sutar
Published:
Last Updated:
पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱया ९९३ मूर्तिकारांना मंडपासाठी परवानगी देण्यात आली असून त्यांना मूर्ती घडविण्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात जागाही मोफत देण्यात आली आहे. अशी माहिती पालिकेनं दिली आहे.
मंडळांना मोफत शाडू माती वाटप, पर्यावरणपूरक मूर्तींसाठी ९९३ मूर्तिकारांना मंडप उभारण्यास पालिकेकडून मंजुरी

Mumbai – पर्यावरणपूरक मूर्तींसाठी पालिकेनं पुढाकार घेतला आहे. पर्यावरणपूरक मूर्तींसाठी एकूण ९९३ मूर्तिकारांना मूर्ती घडविण्यासाठी मंडप परवानगी देण्यात आली आहे. ज्या मूर्तिकारांना आणखी शाडू माती हवी असेल, त्यांनी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर (www.mcgm.gov.in) ‘नागरिकांकरीता’ या रकान्यामध्ये ‘अर्ज करा’ या रकान्यात ‘मंडप (सार्वजनिक गणेशोत्सव/नवरात्रौत्सव/इतर उत्सव)’ या सदरामध्ये मागणी नोंदवावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

विनामूल्य जागा उपलब्ध…

दरम्यान, सन २०२४ मध्ये २०० पेक्षा अधिक मूर्तिकारांना मिळून ५०० टन इतकी माती मोफत देण्यात आली होती. त्यातुलनेत यावर्षी एप्रिल २०२५ पासूनच पर्यावरणपूरक मूर्ती घडविण्यासाठी मूर्तिकारांनी मोठ्या प्रमाणात शाडू मातीची मागणी केली अणि महानगरपालिकेने त्यांची मागणी पूर्ण केली आहे, हे उल्लेखनीय आहे. पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱया मूर्तिकारांसाठी महानगरपालिकेच्या उपलब्ध असलेल्या जागेनुसार ‘प्रथम अर्जदारास प्राधान्य’ या तत्वावर आवश्यक ती जागा देखील विनामूल्य उपलब्ध करून देण्यात आली आहे.

शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन…

मुंबईत शाडू मातीच्या मूर्ती घडविण्याकरिता प्रोत्साहन मिळावे, जास्तीत जास्त पर्यावरणपूरक मूर्तींची प्रतिष्ठापना व्हावी यासाठी महानगरपालिकेकडून पर्यावरणपूरक मूर्ती घडविणाऱ्या मूर्तिकारांना दरवर्षीप्रमाणे यंदाही मोफत शाडू माती पुरविण्यात आली आहे. श्रीगणेशोत्सव सन २०२५ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी महानगरपालिकेने नियोजन व कार्यवाही देखील सुरू केली आहे.

प्रशासनाकडून निरनिराळ्या सेवा-सुविधा पुरविण्यात येत आहेत. पर्यावरणपूरक उत्सवासाठी सर्व बाबींचा अवलंब केला जात आहे. यावर्षी दिनांक २५ जुलै २०२५ पर्यंत ९१० टन २३५ किलो इतकी शाडू माती मोफत वाटप करण्यात आली आहे.