दिवाळीनंतर सोने-चांदीचे दागिने खरेदीसाठी सुवर्णसंधी; दरामध्ये लक्षणीय घट होण्याचा तज्ज्ञांचा अंदाज

Rohit Shinde

दसरा असो वा धनत्रयोदशी किंवा दिवाळी पाडवा….ग्राहकांना यंदाच्या दिवाळीत सोने-चांदीचे दागिने खरेदी करताना वाढीव दरांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे मनमुराद खरेदी देखील करता आलेली नाही. त्यामुळे गुंतवणूक करताना देखील प्रचंड अस्थिरतेचा सामना करावा लागत आहे. अशा परीस्थितीत सोने अथवा चांदीच्या दागिन्यांची खरेदी करू इच्छीणाऱ्यांसाठी आणि त्यामध्ये गुंतवणूक करू इच्छीणाऱ्यांसाठी दिवाळीनंतर सुवर्णसंधी निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण, दिवाळीनंतर सोने-चांदीच्या दरात चांगलीच घसरण होईल, असा अंदाज सध्या तज्ज्ञांकडून वर्तविला जात आहे.

दिवाळीनंतर सोने-चांदीचे दर घटणार?

सध्याच्या मूलभूत बाबींचे मूल्यांकन आधीच झाले असल्याने आणि आठवड्याच्या मध्यानंतर भौतिक मागणी कमी होईल, त्यामुळे सोन्याच्या किमतीत काही सुधारणा होऊ शकतात, असे जेएम फायनान्शियल सर्व्हिसेस लिमिटेडचे ​​कमोडिटीज आणि करन्सी रिसर्चचे उपाध्यक्ष प्रणव मीर म्हणाले. त्यांनी पुढे सांगितले की, व्यापारी चीनमधील डेटा, यूके महागाई, विविध क्षेत्रांमधील पीएमआय डेटा, यूएस ग्राहक विश्वास डेटा आणि फेडरल रिझर्व्हच्या टिप्पण्यांसह प्रमुख जागतिक निर्देशकांवर लक्ष ठेवतील. त्यामुळे भौतिक मागणीत घट झाल्यास सोने-चांदीच्या किंमतीमध्ये चांगलीच घसरण पाहायला मिळू शकते.

सध्या बाजारात दराची काय स्थिती?

ऑक्टोबर महिन्याच्या सुरूवातीपासूनच सोने- चांदीच्या दरात चांगलीच हालचाल पाहायला मिळत आहे. दरांमध्ये सातत्याने बदल होत आहे. सोने अथवा चांदीचे दागिने खरेदीचा विचार करत आहात का? आज बुधवार, 22 ऑक्टोबर, 2025 रोजीचे सोन्याचे आणि चांदीचे दर समोर आले आहेत. दरातील चढउतार कायम आहेत. आज सोन्याच्या दरामध्ये तोळ्यामागे (10 ग्रॅम) 3,380 रूपयांची घट झाली आहे.तर चांदीच्या दरात किलोमागे 2,000 रूपयांची घसरण झाली आहे. सोन्याचा दर 1.27 लाखाच्या पार पोहोचला आहे. तर चांदीचा दर 1.62 लाखांच्या पार पोहोचला आहे. सराफा बाजारातील आजची दरांची स्थिती जाणून घेऊ…

सराफा बाजारातून आज सोने चांदीच्या दरांबाबत जी अपडेट समोर आलीयं, त्यानूसार (Gold Silver Price Today) 22 ऑक्टोबर, 2025 रोजी 22 कॅरेट सोन्याची किंमत (Gold Rate Today) 1,16,750/- तर 24 कॅरेट सोन्याची किंमत 1,27,350/- रूपये 18 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याची किंमत 95,550/- रुपये इतकी आहे. तर 1 किलो चांदीची किंमत देशातील बहुंताश प्रमुख शहरात 1, 62, 000/- रुपयांच्या आसपास आहे.

ताज्या बातम्या