MP Breaking News
Thu, Dec 18, 2025

कल्याणमधील दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Written by:Astha Sutar
Published:
इमारतीतील इमारत धारकांनी तसेच धोकादायक सदृश्य इमारतधारकांनी आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. तसेंच इमारत ‘धोकादायक’ घोषित करण्यात आली होती.
कल्याणमधील दुर्घटनेत मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे ५ लाखांची मदत, मुख्यमंत्र्यांची घोषणा

Kalyan Building Slab Collapse : मंगळवारी कल्याणमध्ये मोठी दुर्घटना घडली. एका ४ मजली इमारतीचा स्लॅब कोसळून ६ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ८ लोक जखमी झाले असून, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, दुर्घटनेत ६ जणांचा मृत्यू झाला त्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. मृत्यूमुखी पडलेल्या कुटुंबीयांना राज्य सरकारने आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.

शासनातर्फे ५ लाखांची मदत…

दरम्यान, कल्याणमध्ये इमारतीचे छत कोसळून मृत्यू झालेल्या ६ नागरिकांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करुन त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. तसेंच मृतांच्या कुटुंबीयांना शासनातर्फे ५ लाखांचे अर्थसहाय्य देण्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी केली आहे. दुसरीकडे इमारतीचा स्लॅब कोसळून झालेल्या दुर्घटनेनंतर कल्याण डोंबिवली महापालिकेने महापालिका क्षेत्रात ५१३ इमारती धोकादायक/ अतिधोकादायक घोषित करण्यात आल्या आहेत.

नोटीस पाठवली होती – केडीएमसी

महापालिका परिक्षेत्रात ३० पेक्षा जास्त जुन्या, इमारतीतील इमारत धारकांनी तसेच धोकादायक सदृश्य इमारतधारकांनी आपले स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे असे आवाहन महापालिकेमार्फत करण्यात येत आहे. तसेंच इमारत ‘धोकादायक’ घोषित करण्यात आली होती. अधिकाऱ्यांनी सांगितले, की इमारतीचा स्लॅबच्या ढिगाऱ्याखाली अजूनही काही जण अडकले असण्याची शक्यता आहे.

त्यांना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही इमारत ‘धोकादायक’ घोषित करण्यात आली होती आणि पावसाळ्यापूर्वी ती रिकामी करण्यात यावी, असा आदेश दिला गेला होता. परिसर रिकामा करण्यासाठी पावसाळ्यापूर्वी नोटीसही दिली गेली होती, मात्र अपघाताच्या वेळीही लोक त्या इमारतीत उपस्थित होते, असे केडीएमसीने सांगितले आहे.