सरकार लागले आषाढी वारीच्या तयारीला ; चोख नियोजनासाठी महत्वाचे निर्णय

Rohit Shinde

पंढरपूर आषाढी वारी ही महाराष्ट्रातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक धार्मिक परंपरा आहे. ही वारी संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालख्यांसोबत पंढरपूरातील श्री विठोबा रुख्मिणी मंदिरात पोहोचते. लाखो वारकरी पदयात्रा करत “ज्ञानोबा-तुकाराम”चा जयघोष करीत विठुरायाच्या भेटीस जातात. ही वारी श्रद्धा, भक्ती, समानता आणि एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. समाजातील विविध स्तरांतील लोक एकत्र येऊन भक्तिभावाने सामील होतात. वारीमुळे संयम, समर्पण, आणि साधेपणा यांचे महत्त्व पटते. या परंपरेतून संत साहित्य, कीर्तन, भजन आणि नामस्मरणाची परंपरा जिवंत ठेवली जाते. आषाढी वारी हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि धार्मिक आयुष्याचे जणू आत्मा आहे. आता चालू वर्षांच्या आषाढी वारीच्या नियोजनाला राज्य सरकार लागले आहे,

आषाढी वारीचे नियोजन सुरू

आषाढी वारी आणि वारकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्यांच्या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष बैठक पार पडली. आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी त्यांचा समूह विमा काढण्यात येणार आहे. यासोबतच वारकऱ्यंना दरवर्षीप्रमाणे यंदाही वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येणार आहे. तसेच दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा वारकरी वाहनांना टोलमध्ये सवलत दिली जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

सुरक्षित आणि किफायतशीर प्रवास

या संपूर्ण वारी आणि आषाढी यात्रा यामध्ये यंदा देखील स्वच्छता आणि आरोग्याच्या सुविधांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असणार आहेत. यंदाच्या वर्षी सुद्धा आषाढी वरीनिमित्त राज्याच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार आहेत. तसेच वारकऱ्यांसाठी कार्डीएक रुग्णवाहिकेची सुद्धा सोय केली जाणार आहे. पंढरपूर येथे तात्पुरती आयसीयू सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी स्वत: पंढरपूर येथे जाऊन आढावा घ्यावा असे निर्देशही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. वारकऱ्यांची वारी सुरळीत व्हावी यासाठी राज्यसरकार प्रयत्नशील आहे.

ताज्या बातम्या