गणेशोत्सवाच्या पूर्वी राज्यात मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता आहे. हवामान विभागाकडून तसा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मागच्या आठवड्यात जोरदार पाऊस झाल्याचे बघायला मिळाले अनेक ठिकाणी पूर आले तर शेती पिकांचे कोट्यवधीचे नुकसान झाले. आता कुठे पावसापासून दिला मिळाला असतानाच आता परत एकदा पावसाचा इशारा देण्यता आला आहे. या आठवड्यात घराघरात गणेशोत्सवाच्या उत्सवाचे आगमन होणार आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार बाप्पाच्या स्वागताच्या काळात पावसाची तीव्रता वाढू शकते. आजपासून पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तवला, ते सविस्तर जाणून घेऊ…
अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज
रायगड, ठाणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि धुळे या जिल्ह्यांमध्ये वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिकसारख्या उत्तर महाराष्ट्रातील काही भागात पावसाचा जोर अधिक राहील, तर काही ठिकाणी उन्हाळ्याप्रमाणे पावस आणि उन्हाचा बदलत खेळ पाहायला मिळेल. घाटमाथा तसेच पुणे, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता मुसळधार ते अत्यंत मुसळधार या प्रकारे बदलत राहण्याची शक्यता आहे.
विदर्भात मात्र आज आणि उद्या पुढील 48 तासांमध्ये पावसाची शक्यता नाही. पावसामुळे दमट हवामान असून उकाड्यामुळे त्रास होऊ शकतो. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, बाप्पाच्या आगमनानंतर विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. परभणी, जालना, हिंगोली, नांदेड आणि लातूर येथे पुढील चार दिवस हलका ते मध्यम पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे, तर काही भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.





