मुंबई- खालिद का शिवाजी’ चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्यासाठी थेट सेन्सॉर बोर्डाला पत्र पाठवलंय
यासोबतच चित्रपटाच्या निर्मात्यांनाही कायदेशीर नोटीस बजावण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात कोणतीही जातीय जनगणना नव्हती
अशा परिस्थितीत ३५% मुस्लिम सैनिक असल्याचा दावा कोणत्या आधारावर केला जात आहे? असा सवाल हिंदू जगजागृती समितीने उपस्थित केला आहे.
या सिनेमातून खोटा इतिहास सांगितला जात असल्याचा हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप आहे. या सिनेमातून हिंदूंचं विभाजन करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही करण्यात आलाय. या सिनेमाविरोधात हिंदू संघटनांच्या भूमिकेनंतर मुंबई पोलिसांनी एक औपचारिक नोटीस जारी केली आहे.
काय आहे सिनेमात?
खालिद का शिवाजी या सिनेमात खालिद नावाच्या एका मुसलमान तरुणाची कहाणी आहे. एका मुसलमान तरुणाच्या दृष्टीतून त्याला छत्रपती शिवाजी महाराज कसे भासतात आणि त्यांच्या कार्यातून तो कशी प्रेरणा घेतो, हे या सिनेमातून दाखवण्यात आलं आहे. आपल्या धर्मामुळे त्याला वेगळी वागणूक मिळत असल्याचंही दाखवण्यात आलंय. सिनेमावर हिंदूत्ववादी टीका करत असले तरी समीक्षकांनी मात्र या सिनेमाचं भरपूर कौतुक केलं आहे. या वर्षी झालेल्या प्रतिष्ठीत कान फिल्म फेस्टिव्हलमध्ये पाठवण्यात आलेल्या काही मोजक्या सिनेमात या सिनेमाचा समावेश होता.
ऐतिहासिक सिनेमे आणि वाद
छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित छावा चित्रपटाचा ट्रेलर रिलिज झाल्यावरही वाद उफाळल्याचं बघायला मिळालंछत्रपती संभाजी महाराजांसह महाराणी येसूबाईंचं एकत्र लेझीम नृत्यावर आक्षेत घेण्यात आला
त्यामुळं प्रदर्शनापूर्वी छावातील नृत्याचं दृश्य वगळावं लागलं होतं याआधी बाजीराव मस्तानी, पद्मावत, जोधा-अकबर, तानाजी या चित्रपटांचा वादही चांगलाच गाजला होता
टिझरवरुन विरोध किती योग्य?
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांच्या लढाई कोणत्याही धर्माविरोधात नव्हती हे सर्वश्रूत आहे .आपल्या राजासोबत सर्वधर्मीय लोक होते, म्हणून ते राज्य निर्माण करु शकलेत. त्यामुळं फक्त चित्रपटाच्या टिझरवरुन मत बनवणं योग्य आहे का ? . छावाप्रमाणेच ‘खालिद का शिवाजी’ हा चित्रपट प्रदर्शनापूर्वी हिंदू संघटना, इतिहास तज्ज्ञ यांना दाखवावा जेणेकरुन वाद तोडगा निघेल असं सांगण्यात येतंय.





