उद्या पालघर जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी; अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे प्रशासनाचा निर्णय

पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पावसाचा देण्यात आलेला इशार लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.

पालघर जिल्ह्यातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी एक महत्वाची बातमी समोर येत आहे. महाराष्ट्र अतिवृष्टीच्या संकटातून सावरलेला नसताना आता पुढच्या काही दिवसांत पावसाचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे. हीच बाब लक्षात घेता आता पालघर जिल्हा प्रशासनाने पालघर जिल्ह्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पावसाचा देण्यात आलेला इशारा लक्षात घेता पालघर जिल्ह्यातील प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. दिनांक 29 सप्टेंबर रोजी ही सुट्टी असणार आहे.

जिल्ह्यातील सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी

पालघर जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. सध्या पालघर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पाऊस बरसत आहे. त्यामुळे गरज असेल तरच लोकांनी घराबाहेर पडावे, असे आवाहन करण्यात आले आहे. पुढच्या काही तासांत पावसाचा हा जोर वाढणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. तसा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना सोमवारी म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी शाळेत जाण्यची गरज नाही.

पालघर जिल्ह्याला 28 आणि 29 सप्टेंबर रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलेला आहे. या भागातील नदी, नाले, तलाव तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक ठिकाणी पूलही पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे शाळेत जाताना विद्यार्थ्यांना अडचण येऊ नये तसेच विद्यार्थ्यांनी आपला जीव धोक्यात घालू नये, यासाठी जिल्ह्यातील सर्वच शाळांना सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोकणात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज

हवामान विभागानुसार, बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले तीव्र कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर आले आहे. त्यामुळे राज्यभर पावसाचा जोर वाढला आहे. पुढील ४८ तास महाराष्ट्रातील अनेक भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विशेषतः मुंबई, कोकण, पुणे, नाशिक घाटमाथा आणि मध्य महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी करण्यात आला असून, उर्वरित राज्यातही जोरदार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, पालघर, रायगड जिल्ह्याला उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News