Eknath Shinde – उद्धव ठाकरेंच्या दिल्ली दौऱ्यात काल इंडिया आघाडीसोबत बैठक पार पडली. या बैठकीत शेवटच्या रांगेत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे व संजय राऊत बसल्याचं दिसत आहे. शेवटच्या रांगेतील फोटो विरोधकांनी सोशल मीडियावर व्हायरल केले असून, उद्धव ठाकरेंना शेवटच्या रांगेत बसायला दिल्यामुळे काँग्रेसने तुमची जागा दाखवली, तुम्ही स्वाभिमान गहान ठेवला, अशी टिका एकनाथ शिंदेंनी केली आहे, याला आदित्य ठाकरेंनीही जोरदार प्रतिउत्तर दिलं आहे.
त्यांनी बाळासाहेबांची माफी मागावी…
दरम्यान, उबाठाचा दिल्ली अपमान झाला. यावर त्यांना काय वाटत नसेल तर त्याला आम्ही काय करणार? यावर मला काही प्रतिक्रिया द्यावी असे वाटत नाही. ज्यांनी बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले. स्वाभिमान गहाण ठेवला. अशा लोकांना काँग्रेसने त्यांची जागा दाखवली आहे. त्यामुळे मी त्याच्यावर का बोलू इच्छित नाही. उलट तुम्ही त्यांना विचारलं पाहिजे की, तुम्हाला एवढ्या मागे का बसवलं? आम्ही विकासाची कामं पुढे नेत आहोत.
बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे नेत आहोत. त्यांनी हिंदुत्वाचे विचार बाजूलान ठेवले, म्हणून मी नेहमी म्हणत असतो की, विचार पुढे असतात आणि लाचार मागे असतात, असा टोला एकनाथ शिंदेंनी उबाठा गटाला लगावला आहे. तसेच त्यांनी आता झालेल्या अपमानाबद्दल बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर जाऊन माफी मागावी, अशी टीकाही एकनाथ शिंदेंनी उबाठा गटावर केली आहे.
काहींना मी महत्त्व देत नाही…
राहुल गांधींनी जे प्रेझेंटेशन दिले आणि महाराष्ट्रात मतांची कशी चोरी झाली. याबाबत ते एक्सपोस केलेलं आहे. त्यामुळे देशात आणि राज्यात कसे हे आपल्या डोक्यावर बसलेत, काही ठिकाणी फेकण्यात बसलेत हे समजलं आहे. म्हणून त्यांना वाईट वाटत आहे. दुसरीकडे तुम्ही पिक्चर बघायला थेटरमध्ये पुढे बसता की मागे बसता. तिथे घरगुती वातावरण होतं आणि पुढे बसून स्क्रीनमध्ये चांगले दिसत नव्हतं. म्हणून पाठीमागेच्या रांगेत बसलो. घरगुती कार्यक्रम होता, आणि आम्हाला पुढे बसायचं की मागे बसायचं, हे चांगलं कळतं. परंतु काही काही लोकं मुद्दाम पुढे येऊन घुसतात, तसं आम्ही नाही केलं. आणि मी काही लोकांना महत्त्व देत नाही. असा टोला आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना लगावला.
काँग्रेसने तुमची काय अवस्था करून ठेवली…
“आरे आरे आरे, काय तुमची ही किंमत उद्धव ठाकरे…शिवरायांचा वारसा सांगता ना रे… खांग्रेसच्या मीटिंगमध्ये जाऊन शेवटच्या रांगेत बसलात रे???? बाळासाहेबांनी आम्हाला आत्मसन्मान, स्वाभिमान शिकवला. अपमानाविरुद्ध पेटून उठायचा शिवरायांनी आणि बाळासाहेबांनी धडा दिला. तुम्ही यातलं काहीच घेतलं नाही का रे?? काँग्रेसने तुमची काय ही अवस्था करून ठेवली आहे.
आदित्य ठाकरे… तुमच्यापेक्षा एकेक खासदारवाले पक्ष बरे, त्यांना सुद्धा पुढच्या रांगेत बसवलं रे, महाराष्ट्राची दिल्लीत जाऊन तुम्ही पार लाज घालवलीत रे…, थोडा जरी स्वाभिमान आत्मसन्मान शिल्लक असेल तर जरा तरी पेटून उ(बा)ठा ना रे, महाराष्ट्राची किंमत कोणी कुठे वाढवली. ते जरा दुसऱ्या फोटोंत बघा रे…..” अशी उपरोधिक टीका नरेश म्हस्के यांनी उबाठा गटावर केली आहे.
तुम्ही दिल्लीत बूट चाटायला येता…
दुसरीकडे राहुल गांधीं ओपन स्पेसमध्ये प्रेझेंटेशन दाखवत होते. आणि स्क्रीन लावली होती. ते पुढे बसून व्यवस्थित दिसत नव्हत. आम्हाला काही प्रमुख नेत्यांना पुढच्या रांगेत बसण्याची व्यवस्था केली होती. कारण पाठीमागच्या रांगेतून प्रेझेंटेशन व्यवस्थित दिसत होतं. त्याचे फोटो सुद्धा माझ्याकडे आहेत. मात्र आमच्यावर टिका करणारे दिल्लीत काय बूट चाटायला येतात. नरेश म्हस्के म्हणजे दूतोंडी गांडूळ आहे. जेव्हा बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना तोडली, तेव्हा तुमचा शिवरायांचा स्वाभिमान कुठे गेला होता? असा पलटवार खासदार संजय राऊत यांनी नरेश म्हस्के यांच्यावर केला आहे.





