अवैध दारू तस्करी ही राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेसोबतच महसूल विभागासाठीही मोठी डोकेदुखी ठरते. या तस्करीमुळे सरकारला मिळणारे अधिकृत कर व महसूल मोठ्या प्रमाणात कमी होतो. सीमावर्ती भाग, महामार्ग आणि ग्रामीण मार्गांवरून मोठ्या प्रमाणात अवैध दारूची वाहतूक होत असल्याने तपास यंत्रणांवर अतिरिक्त ताण येतो. महसूल विभागाचे उत्पन्न बुडाल्याने विकासकामांवर परिणाम होतो, तसेच तस्करांचे जाळे अधिक बळकट होत राहते. त्यामुळे महसूल विभाग अशा घटनांवर सातत्याने नजर ठेऊन असतो. अनेकदा कारवाई देखील केली जात आहे. नागपूर-चंद्रपूर महामार्गावर नुकतीच महसूल विभागाकडून एक मोठी कारवाई करण्यात आली आहे.
अवैध दारू वाहतुकीचा पर्दाफाश
चंद्रपूरच्या वरोरा येथे उत्पादन शुल्क विभागाने येन्सा जवळ ६.४० लाख रुपयांची अवैध आणि बनावट दारू जप्त केली. या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली. अशी माहिती समोर आली आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने नागपूर रस्त्यावर येन्सा गावाजवळ एका मोठ्या कारवाईत छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात अवैध आणि बनावट दारूसह तीन आरोपींना अटक केली. येन्साहून माजरा येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला थांबवून ही कारवाई करण्यात आली. वाहनाची झडती घेतली असता अवैध आणि बनावट दारूच्या ५०० हून अधिक बाटल्या आढळून आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहून नेणारे वाहन येत असल्याची माहिती मिळाली.

कारवाईत तीन जण अटकेत
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाने नागपूर रस्त्यावर येन्सा गावाजवळ एका मोठ्या कारवाईत छापा टाकला आणि मोठ्या प्रमाणात अवैध आणि बनावट दारूसह तीन आरोपींना अटक केली. येन्साहून माजरा येथे जाणाऱ्या चारचाकी वाहनाला थांबवून ही कारवाई करण्यात आली. वाहनाची झडती घेतली असता अवैध आणि बनावट दारूच्या ५०० हून अधिक बाटल्या आढळून आल्या. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वरोरा पथकाला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहून नेणारे वाहन येत असल्याची माहिती मिळाली. त्यामुळे महसूल विभागाच्या या धडक कारवाईमुळे अनेकांची दाणादाण उडाली आहे.