Indian Railway : ख्रिसमस – 31 डिसेंबर गोव्याला जाणाऱ्यांसाठी खुशखबर!! रेल्वेकडून अतिरिक्त गाड्या जाहीर

मध्य व कोकण रेल्वेकडून (indian Railway) डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान विविध गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे कडून तीन महत्त्वाच्या मार्गावर 22 डब्यांच्या विशेष गाड्या सोडण्यात येणार असून, यामध्ये वातानुकूलित, स्लिपर आणि जनरल असे सर्व प्रकारचे डबे यामध्ये उपलब्ध असतील

Indian Railway : सध्याचे दिवस हे हिवाळ्याचे असून याच महिन्यात ख्रिसमस सारखा महत्त्वाचा सण साजरा होतोय, तर दुसरीकडे नवीन वर्षाची सुद्धा आतुरतेने वाट बघितली जाते. आपले पैकी अनेक जण नवीन वर्षाच्या स्वागताला गोव्याला जातात आणि 31 डिसेंबरच्या मध्यरात्री जंगी पार्टी करतात. साहजिकच या काळात गोव्याच्या दिशेने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असल्याने रेल्वे प्रशासनावर अतिरिक्त ताण वाढतो. याच पार्श्वभूमीवर रेल्वे विभागाने अतिशय मोठा निर्णय घेतला आहे.

मध्य व कोकण रेल्वेकडून (indian Railway) डिसेंबर 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान विविध गाड्यांच्या विशेष फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. मध्य रेल्वे कडून तीन महत्त्वाच्या मार्गावर 22 डब्यांच्या विशेष गाड्या सोडण्यात येणार असून, यामध्ये वातानुकूलित, स्लिपर आणि जनरल असे सर्व प्रकारचे डबे यामध्ये उपलब्ध असतील. या अतिरिक्त विशेष ट्रेन कोणत्या आहेत आणि त्या कुठून धावणार आहेत हे आपण सविस्तरपणे जाणून घेऊयात…

मुंबई सीएसएमटी-करमाळी (Indian Railway)

सीएसएमटी- करमाळी ही विशेष गाडी (01151/01152) डिसेंबरपासून 5 जानेवारी 2026 पर्यंत रोज धावणार आहे. ही रेल्वे मुंबई सीएसएमटी स्थानकातून रात्री 12.20 मिनिटांनी सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 1.30 वाजता करमळी येथे पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन करमाळीहून दुपारी 2.15 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी पहाटे 3:45 मिनिटांनी मुंबईत पोहोचेल. मुंबई सीएसएमटी-करमाळी रेल्वे दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ व थिविम या रेल्वे स्थानकावर थांबेल.

एलटीटी – तिरुवनंतपुरम (साप्ताहिक):

महाराष्ट्र- केरळ मार्गावरील अतिरिक्त गर्दीसाठी लोकमान्य टिळक टर्मिनल – तिरुवनंतपुरम उत्तर (01171/01172) ही साप्ताहिक गाडी 18, 25 डिसेंबर, तसेच 1 व 8 जानेवारी रोजी एलटीटीहून सांयकाळी 4 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी रात्री 11:30 वाजता ती तिरुवनंतपुरम येथे पोहोचेल. या रेल्वेला कोकण व केरळातील 40 पेक्षा अधिक स्थानकांवर थांबा देण्यात आला आहे.

एलटीटी – मंगळुरू (साप्ताहिक):

एलटीटी-मंगळुरू (01185/01186) ही साप्ताहिक ट्रेन 16, 23 आणि 30 डिसेंबर, तसेच 6 जानेवारी रोजी सायंकाळी 4 वाजता एलटीटीहून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10:05 वाजता मंगळुरू जंक्शनला पोहोचेल. परतीच्या प्रवासात ही ट्रेन 17, 24, 31 डिसेंबर आणि 7 जानेवारी रोजी दुपारी 1 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 6:50 मिनिटांनी एलटीटी येथे येतील. ही रेल्वे  ठाणे, पनवेल, पेण, रोहा, खेड, चिपळूण, कणकवली, कुडाळ, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडुपी, सुरतकल या रेल्वे स्थानकावर थांबेल.


About Author

Asavari Khedekar Burumbadkar

Other Latest News