MP Breaking News
Sat, Dec 20, 2025

मेलो तरी चालेल…, पण आरक्षण घेऊनच उठणार, हायकोर्टाचा निर्णयानंतर मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?

Written by:Astha Sutar
Published:
आता ही शेवटची आणि आरपारची लढाई आहे. सरकारी येऊ द्या... पोलीस येऊ द्या... प्रशासन येऊ द्या... बंदूक घेऊन या... गोळ्या घालून दे... मी मेलो तरी चालेल. पण इथून आरक्षण घेऊनच उठणार. आपल्या लेकरांसाठी आपल्या समाजासाठी मी आरक्षण घेणारच.
मेलो तरी चालेल…, पण आरक्षण घेऊनच उठणार, हायकोर्टाचा निर्णयानंतर मनोज जरांगे-पाटील काय म्हणाले?

Maratha Reservation – मनोज जरांगे-पाटील हे मराठा आरक्षणासाठी मुंबईत गेल्या चार दिवसांपासून आंदोलन करतात. आज त्यांचा आंदोलनाचा चौथा दिवस आहे. दरम्यान, मनोज जरांगे-पाटील यांना आंदोलनासाठी परवानगी दिली नाही, राज्य सरकारचा हायकोर्टात दावा केला आहे. उद्या मंगळवारपर्यंत दक्षिण मुंबई रहदारीसाठी मोकळी करण्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. त्यासाठी कायद्यानं योग्य ती कारवाई करा, असं हायकोर्टानं आंदोलनावर म्हटलं आहे. दरम्यान, कोर्टाच्या निर्णयानंतर मनोज जरांगे-पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारला निर्वाणीचा इशारा दिला आहे.

ही शेवटची आणि आरपारची लढाई…

दरम्यान, मेलो तरी चालेल…, पण आरक्षण घेऊनच उठणार आहे. असा इशारा जरांगे-पाटील यांनी राज्य सरकारला दिला आहे. मराठा आरक्षणासाठी गेल्या चार दिवसांपासून मुंबईत मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. गर्दीचा परिणाम वाहतूक कोंडीवर होत आहे. तसेच सीएसएमटी स्थानक आणि दक्षिण मुंबईतील परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. आंदोलनाचा त्रास मुंबईकरांना होत आहे. तसेच पार्किंग ठिकाणी गाड्या न लावता रस्त्यावर गाड्या लावल्या जात आहेत. त्या गाड्या आंदोलकांनी मैदानात लावावा. आणि मैदानातच राहावे, असे मी आंदोलकांना आवाहन करतो. आणि ज्यांना कुणाला हे ऐकायचं नसेल त्यांनी आपल्या गावी जावं, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलं.

इथे षडयंत्र दिसतेय…

आपण गरीब लोकं आहोत. आपल्यामुळे मुंबईकरांना त्रास होता कामा नाही. कुणाला त्रास देऊन आपण आरक्षण मिळवायचे नाही, असे जरांगे पाटील म्हणाले. अंतरवाली सराटीमध्येही आंदोलन करणारे हेच आंदोलनकर्ते होते. पण इथे षडयंत्र दिसते. माध्यमकर्मीना, पत्रकारांना आंदोलनकर्ते त्रास देत असल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या. तसेच टीव्हीजेए या संघटनेने याबाबत मनोज जरांगे-पाटील यांना निवेदन दिले होते. अनेक पत्रकार, महिला पत्रकार यांनी तक्रारी केल्या होत्या. आंदोलकर्ते दगड मारतात… कॅमेरासमोर येतात… महिलांचा विनयभंग करताहेत… यावर मनोज जरांगे पाटील यांनी आज आपली भूमिका मांडली. आंतरवाली सराटीत आंदोलन करणारे हेच आंदोलनकर्ते होते. तिथेही तेच पत्रकार होते. परंतु पत्रकारांना त्रास झाला नाही. इथे पत्रकारांना त्रास होतोय. येथे मात्र वेगळे षडयंत्र दिसतेय, असं जरांगे पाटील म्हणाले.

बंदूक घेऊन या… गोळ्या घाला…

मराठा आरक्षण हे ओबीसी आरक्षणातून देऊ नये, असे छगन भुजबळ यांनी म्हटलंय. यावर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, आपण छगन भुजबळ यांना महत्त्व देत नाही. आता ही शेवटची आणि आरपारची लढाई आहे. सरकारी येऊ द्या… पोलीस येऊ द्या… प्रशासन येऊ द्या… बंदूक घेऊन या… गोळ्या घालून दे… मी मेलो तरी चालेल. पण इथून आरक्षण घेऊनच उठणार. आपल्या लेकरांसाठी आपल्या समाजासाठी मी आरक्षण घेणारच आहे. असं जरांगे पाटील म्हणाले. परंतु आपल्या आंदोलनामुळे मुंबईकरांना त्रास होता कामा नये, कोणीही त्रास देऊ नये, असं आवाहन जरांगे-पाटील यांनी आंदोलनकर्त्यांना केलं आहे.