MP Breaking News
Fri, Dec 19, 2025

‘ट्रॅवल अँड लिजर’च्या सर्व्हेत जगभरातील बेस्ट शहरांत भारतातील 3 शहरे; महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश, नेमकी कोणती शहरे ठरली सरस?

Written by:Rohit Shinde
Published:
ट्रैवल एंड लीजरच्या सर्व्हेत भारतातील एका शहराने जगभरातील शहरात पाचवा क्रमांक पटकावला आहे. तर महाराष्ट्रातील आणखी एक शहर यामध्ये समाविष्ट आहे.
‘ट्रॅवल अँड लिजर’च्या सर्व्हेत जगभरातील बेस्ट शहरांत भारतातील 3 शहरे; महाराष्ट्रातील एका शहराचा समावेश, नेमकी कोणती शहरे ठरली सरस?

ट्रॅव्हल अँड लीझर मॅगझिनच्या २०२५ च्या सर्वेक्षणात, जगातील काही देशांना वेगवेगळ्या श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात आले आहेत. सर्वोत्कृष्ट हॉटेल आणि स्पा, बेटे आणि राष्ट्रीय उद्याने, सफारी आणि टूर ऑपरेटर आणि वाहतूक इत्यादी श्रेणींमध्ये विजेते अथवा विजेत्या शहरांची नावे घोषित करण्यात आली आहेत. यामध्ये जगभरातील शहरांत भारतातील एका शहराने टॉप 5 मध्ये स्थान मिळवले आहे.

पिंक सिटी जयपूरला बहुमान

एक श्रेणी अशी होती की शहरे ज्यामध्ये जगातील सर्वोत्तम २५ शहरे निवडली गेली. या यादीत भारतातील एका शहराला पाचवे स्थान मिळाले आहे.हे ते शहर आहे ज्याला गुलाबी शहर म्हणतात. अथवा पिंकी सिटी म्हणून देखील जयपूरला ओळखले जाते. आता तुम्ही ते ओळखले असेलच. राजस्थानातील जयपूर शहराला २०२५ च्या ट्रॅव्हल अँड लीजर सर्व्हेमध्ये पाचव्या क्रमांकाचे सर्वोत्तम शहर म्हणून गौरविण्यात आले आहे.

मुंबई आणि आग्र्याचा समावेश

ट्रॅव्हल अँड लीजर सर्व्हे २०२५ च्या टॉप २५ शहरांच्या यादीत, जगातील विविध शहरांची निवड त्यांच्या संस्कृती, सौंदर्य, खरेदी, आकर्षणे, हॉटेल्स आणि जागतिक दर्जाच्या वातावरणाच्या आधारे करण्यात आली आहे. जयपूर व्यतिरिक्त, भारतातील आणखी २ शहरांचा या यादीत समावेश आहे. त्यामध्ये मुंबई आणि आग्रा या दोन शहरांचा समावेश करण्यात आला आहे.

जगातील टॉप 25 शहरे

  1. सैन मिगुएल डी अलेंदे, मेक्सिको
  2. चियांग माई, थाईलैंड
  3. टोक्यो, जापान
  4. बैंकॉकस थाइलैंड
  5. जयपुर, भारत
  6. होई एन, वियतनाम
  7. मेक्सिको सिटी, मेक्सिको
  8. क्योटो, जापान
  9. उबुद, बाली
  10. कुस्को पेरू
  11. फ्लोरेंस, इटली
  12. सेविल, स्पेन
  13. ग्रेनाडा, स्पेन
  14. इस्तांबुल, तुर्की
  15. सिएम रीप, कंबोडिया
  16. मुंबई, भारत
  17.  केप टाउन, दक्षिण अफ्रीका
  18. रोम, इटली
  19. सांता फ़े, न्यू मेक्सिको
  20. आगरा, भारत
  21. ओक्साका, मेक्सिको
  22. मेंडोज़ा, अर्जेंटीना
  23. सिएना, इटली
  24. पोर्टो, पुर्तगाल
  25. मेरिडा, मेक्सिको

जयपूरची विशेषता नेमकी काय?

जयपूर, राजस्थानची राजधानी, ही “गुलाबी शहर” म्हणून ओळखली जाते. १७२७ मध्ये महाराजा सवाई जयसिंह यांनी या शहराची स्थापना केली. शहरातील इमारती गुलाबी रंगाने रंगवल्यामुळे त्याला हे विशेष नाव मिळाले. जयपूर हे त्याच्या राजवाड्यांसाठी, किल्ल्यांसाठी, हवामहाल, सिटी पॅलेस, आमेर किल्ला यांसारख्या ऐतिहासिक स्थळांसाठी प्रसिद्ध आहे. येथे राजस्थानी संस्कृती, हस्तकला, पारंपरिक बाजार, आणि स्वादिष्ट जेवण यांचा अनोखा संगम आढळतो. जयपूर हे UNESCO वर्ल्ड हेरिटेज शहरही आहे. येथील जलमहल व जंतरमंतर यांसारखी ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षण ठरतात. या शहरात आधुनिकता आणि परंपरा यांचा सुरेख समतोल दिसतो.