Satara Doctor Suicide: “डॉक्टर तरूणीची आत्महत्या नव्हे, संस्थात्मक हत्या…”, जितेंद्र आव्हाड असं का म्हणाले?

साताऱ्यातील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात सातत्याने नवे खुलासे होताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत ही हत्या असल्याचा दावा अनेकांकडून केला जात आहे. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाडांनी देखील आता या प्रकरणात उडी घेतली आहे.

फलटण ग्रामीण रूग्णालयातील डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणात सातत्याने नव्या घडामोडी घडताना दिसत आहेत. अशा परिस्थितीत संपूर्ण राज्यात साताऱ्यातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येनं खळबळ उडाली आहे, आष्टीचे माजी आमदार भीमराव धोंडे यांनी या महिला डॉक्टरच्या मृत्यूची सखोल चौकशी करावी, अशी मागणी केली आहे. शिवाय आमदार सुरेश धस यांनी देखील घातपाताचा संशय बोलून दाखवला आहे. त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळे वळण मिळताना दिसत आहे. या प्रकरणात निलंबित पीएसआय गोपाळ बदने आणि मित्र प्रशांत बनकर या पलीकडे कुणी तिसऱ्या व्यक्तीचा संबंध आहे का, असा संशय देखील आता यामध्ये व्यक्त केला जात आहे. या प्रकरणात आता जितेंद्र आव्हाड यांनी देखील ही हत्याच असल्याचा दावा केला आहे.

“डॉक्टर तरूणीची आत्महत्या नव्हे, संस्थात्मक हत्या…”

डॉक्टर तरूणीच्या आत्महत्या प्रकरणावर भाष्य करताना जितेंद्र आव्हाड म्हणतात की, ” स्व डॉ.संपदा मुंडे यांची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या आहे.. एका शेतकरी आई-बापाने मोल मजुरी, ऊसतोडणी करून आपल्या लेकीला जिद्दीने घडविले ती कर्तबगार लेक म्हणजे स्व.डॉ.संपदा मुंडे.! चुकीचे नियमबाह्य अहवाल देण्यासाठी तसेच काही पी.एम रिपोर्ट बदलण्यासाठी डॉ.संपदा वर स्थानिक पोलीस प्रशासन व लोकप्रतिनिधी गेल्या वर्षभरापासून प्रचंड दबाव टाकत होते पण डॉ.संपदा कोणत्याही दबावाला न घाबरता आपली आरोग्यसेवा प्रामाणिकपणे करत होते. ती अनेक महिन्यापासून या प्रशासनातल्या असूरी शक्ती विरुद्ध नियतीचा लढा एकटी लढत होती.! पोलीस व प्रशासन आरोग्य विभागातील मधील वरिष्ठ- कनिष्ठ अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधीच्या आशीर्वादाने एकत्र येऊन केलेली संस्थात्मक हत्या आहे. आज आवाज नाही उठवला तर हि जुलमी राजवट महाराष्ट्राच्या घराघरांमध्ये एक डॉ.संपदा करतील..”

डॉक्टर तरूणीची आत्महत्या की हत्या?

“महिला डॉक्टरच्या तळहातावर सात ओळींचा एक संदेश होता. या संदेशातील हस्ताक्षरावरही त्यांनी शंका उपस्थित केली आहे. हातावरील अक्षरात जरा शंका वाटते. त्यांनी आत्महत्या केली की त्यांचा खून करण्यात आला याची पोलिसांनी सखोल चौकशी करुन दोषींना कठोरात कठोर शिक्षा द्यावी” अशी मागणी माजी भीमराव धोंडे यांनी केली आहे. दुसरीकडे आमदार सुरेश धस यांनी देखील इतकी धैर्वयान मुलगी आत्महत्या करेल, हे पटत नाही. असा संशय बोलून दाखविला आहे. त्यामुळे पोलिस आता या प्रकरणाकडे एक हत्या म्हणून पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष आहे.

गोपाळ बदनेला कोर्टाचा मोठा दणका

फलटणच्या डॉक्टर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी गोपाल बदने याला 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सह दिवाणी न्यायाधीश ए. एस. साटोटे कोर्टने हे कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडीची मागणी केली होती. मात्र आरोपीचे वकील अॅड. राहुल धायगुडे यांनी आरोपीचा यात कोणताही दोष नसून त्याला गोवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे आरोपी बदने याला 1 दिवसांची पोलीस कोठडी द्यावी असा युक्तिवाद केला. मात्र कोर्टाने तो युक्तीवाद न मानता गोपाळ बदनेला 5 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.


About Author

Rohit Shinde

Other Latest News