Bank Holiday: दिवाळीतील बँकांच्या सुट्ट्यांबाबत मोठा गोंधळ; तुमच्या शहरातील बँकांच्या सुट्टीचं काय?

दिवाळीतील बँकांच्या सुट्ट्यांच्या तारखांबाबत देशभरात खरंतर मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. अशा परिस्थितीत नेमकी कोणत्या राज्यात कधी आणि किती दिवस सुट्टी असणार ते अधिक सविस्तर जाणून घेऊ...

दिवाळीच्या सणादरम्यान बँकांना काही दिवसांच्या सुट्ट्या असल्याने नागरिकांची मोठी तारांबळ होते. पगार जमा करणे, रोकड काढणे, चेक जमा करणे अशा दैनंदिन आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे निर्माण होतात. ग्रामीण भागात तर बँकांच्या सुट्ट्यांमुळे एटीएममध्ये रोकड संपण्याची समस्या उद्भवते. ऑनलाईन व्यवहारांवरही ताण वाढतो. व्यापारी वर्गालाही या सुट्ट्यांचा फटका बसतो कारण व्यवहार विलंबित होतात. त्यामुळे अनेक नागरिक दिवाळीपूर्वीच आपले आर्थिक व्यवहार उरकण्याचा प्रयत्न करतात. अशा परिस्थितीत दिवाळीच्या काळातील बँकांच्या सुट्ट्यांबाबत मोठा गोंधळ सध्या निर्माण झाला आहे.

बँका कधी बंद राहणार? गोंधळाची स्थिती

काही राज्यांमध्ये सोमवार, 20 ऑक्टोबर दिवाळी साजरी केली जात आहे, तर काहींमध्ये मंगळवार, 21 ऑक्टोबर दिवाळीचा दिवस आहे. या बदलामुळे बँकिंग सेवा राज्यानुसार वेगवेगळ्या दिवशी बंद राहतील. फेस्टिव्हल सीझनमध्ये बँकिंगचे महत्वाचे काम असेल तर नागरिकांनी आपल्या शहरातील सुट्टीची माहिती आधी तपासणे गरजेचे आहे, अन्यथा कामात अडथळा येऊ शकतो.

सोमवारी कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी?

सोमवारी दिवाळी साजरी करणाऱ्या राज्यांमध्ये बँकिंग सेवा पूर्णपणे बंद राहतील. त्रिपुरा, गुजरात, मिजोरम, कर्नाटक, मध्य प्रदेश, चंडीगढ़, तमिळनाडू, उत्तराखंड, असम, तेलंगाना, अरुणाचल प्रदेश, राजस्थान, उत्तर प्रदेश, केरळ, नागालँड, पश्चिम बंगाल, दिल्ली, गोवा, छत्तीसगड, झारखंड, मेघालय, हिमाचल प्रदेश, आंध्र प्रदेश

मंगळवारी कोणत्या राज्यात बँकांना सुट्टी?

मंगळवारी दिवाळी साजरी करणाऱ्या राज्यांमध्ये बँक बंद राहतील. यामध्ये प्रमुख राज्ये महाराष्ट्र, ओडिशा, मध्य प्रदेश ही आहेत.

बँकांना सुट्टी, ऑनलाईन व्यवहार करा!

दिवाळीच्या काळात बँकांना सुट्टी असल्यामुळे अनेक आर्थिक व्यवहारांमध्ये अडथळे येतात. अशावेळी ऑनलाईन व्यवहार हा उत्तम पर्याय ठरतो. इंटरनेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय, गूगल पे, फोन पे, पेटीएम यांसारख्या डिजिटल माध्यमांद्वारे पैसे पाठवणे किंवा बिल भरणे अत्यंत सोपे झाले आहे. ग्राहकांनी या सेवांचा वापर करून वेळ आणि श्रम दोन्ही वाचवू शकतात. तसेच, सुट्ट्यांच्या काळात एटीएममध्ये रोकड उपलब्ध नसेल तर ऑनलाईन व्यवहार अधिक सोयीचे ठरतात. मात्र, फसवणुकीपासून बचावासाठी सुरक्षित व्यवहार करणे आवश्यक आहे. त्यामुळे बँक सुट्टीतही व्यवहार थांबत नाहीत, फक्त माध्यम बदलते.


About Author

Rohit Shinde

Other Latest News