आजपासून ऑगस्ट महिना सुरू झाला तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. आता याबद्दलची मोठी अपडेट समोर आलेली आहे. त्यामुळे नेमके कोणते कोणत्या तारखेला पैसे येणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. राज्य सरकारने गेल्यावर्षी सुरु केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतंर्गत पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात.
5 ऑगस्टपर्यंत पैसे मिळण्याचा अंदाज
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा दुसऱ्या वर्षातील पहिला म्हणजेच जुलै महिन्याचा लाभ अद्याप राज्यातील लाभार्थी बहिणींच्या बँक खात्यात जमा झालेला नाही. ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत लाभ मिळेल, अशी माहिती समोर येत आहे. या योजनेतील मासिक अनुदान हे लाडक्या बहिणींचे एक प्रकारे मासिक वेतनच असून, ते महिन्याच्या अखेरपर्यंत किंवा ऑगस्टच्या 5 तारखेपर्यंत देण्याचे नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्य सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना सुरु केली होती. या योजनेद्वारे पात्र महिलांना दर महिन्याला १५०० रुपये दिले जातात. मात्र आता या योजनेचा जुलै महिन्याचा लाभ अद्याप महिलांना मिळालेला नाही. त्यामुळे हा लाभ कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे. त्यामुळे या उर्वरित दिवसांमध्ये कधीही लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये जमा होऊ शकतात. जून महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्याने जुलैचा हप्ताही उशिराने मिळेल का? असा प्रश्न अनेक महिलांना पडला आहे.
अनेक लाडक्या बहिणी अपात्र
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री असताना गेल्या वर्षी ‘लाडकी बहीण’ योजना सुरू केली होती. जून महिन्यात या योजनेला एक वर्ष पूर्ण झाले. योजनेचा पहिला लाभ राज्यातील २ कोटी ३४ लाख बहिणींना मिळाला होता, त्यानंतर ही संख्या कमी-जास्त होत गेली. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेतील लाभार्थी महिलांची संख्या कमी करण्यासाठी त्यांची छाननी करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. त्यानूसार आजवर अनेक लाडक्या बहिणी अपात्र ठरल्या आहेत.
सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला?
सामाजिक न्याय विभागाला आता कोण न्याय देणार? असा सवाल विचारण्यात येत आहे. या खात्याचा निधी पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेसाठी वळवल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याखात्याचे मंत्री संजय शिरसाट यांनी इतका विरोध करून, खदखद व्यक्त करून आणि नाराजी जाहीर करूनही निधी वळवण्यात आला. विशेष म्हणजे कालच अजितदादा आणि मंत्री शिरसाट यांच्यात बैठक झाली होती. त्यानंतरही हा निर्णय घेतल्याने शिरसाट नाराज असल्याची माहिती समोर येत आहे.





