लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट; ‘या’ तारखेला खात्यामध्ये पैसे जमा होणार?

लाडकी बहीण योजनेच्या ऑक्टोबर महिन्याच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट समोर येत आहे. या महिन्याच्या अखेरीस महिलांच्या खात्यामध्ये 1,500 रूपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

लाडकी बहीण योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. या अपडेटनुसार पुढील काही दिवसात लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे जमा होणार आहे. नुकतंच लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना सप्टेंबरचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. तर आता ऑक्टोबर महिन्याचे पैसै देखील लवकरच जमा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. दिवाळीमुळे हे पैसे महिलांच्या खात्यामध्ये लवकर जमा होतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

ऑक्टोबरचे पैसे लवकरच खात्यामध्ये येणार?

समोर आलेल्या माहितीनुसार, या योजनेच्या लाभार्थी महिलांच्या बँख खात्यात ऑक्टोबर महिन्याचे पैसे महिनाअखेरपर्यंत जमा होऊ शकतात. दिवाळी असल्याने राज्य सरकार महिनाअखेरपर्यंत लाभार्थी महिलांच्या बँक खात्यात पैसै जमा करु शकतात. याबाबत लवकरच मंत्री आदिती तटकरे अधिकृत घोषणा करण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकाच महिन्यात महिलांच्या खात्यामध्ये 3,000 जमा होण्याची शक्यता आहे. कारण, नुकतेच सप्टेंबर महिन्याचे 1,500 रू महिलांच्या खात्यामध्ये जमा झाले होते.

e-kyc ची प्रक्रिया नेमकी काय?

योजनेतील महिला लाभार्थ्यांसाठी आता एक मोठा बदल करण्यात आला आहे. केवळ लाभार्थी महिलेचेच नाही, तर त्या महिलेचे पती किंवा वडिलांचे ई-केवायसी (e-KYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. या नव्या नियमानुसार, सरकार आता लाभार्थी महिलेच्या उत्पन्नासोबतच तिच्या कुटुंबाचे एकूण वार्षिक उत्पन्न पडताळून पाहणार आहे.

  • लाभार्थी महिलांना https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत वेब पोर्टलवर जाऊन ई-केवायसी करायची आहे.
  • संपूर्ण प्रक्रियेमध्ये तुम्हाला तुमची काही महत्त्वाची कागदपत्रे आणि माहिती पुन्हा अपलोड करावी लागेल.
  • तुमचे नाव, पत्ता, शिधापत्रिका (रेशन कार्ड) क्रमांक, उत्पन्नाची माहिती आणि आधार कार्डची माहिती यांचा समावेश असेल. प्रोसेस पूर्ण होईल.

पती/वडिलांचे तपशील आणि घोषणापत्र

लाभार्थी पात्र असल्यास तिला पुढील टप्प्यातील ई केवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल. यात पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल. यानंतर संमती दर्शवून OTP टाकून Submit करावे. त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील गोष्टी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील. माझ्या कुटुंबातील सदस्य शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत नियमित/कायम कर्मचारी म्हणून कार्यरत नाहीत किंवा निवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत. माझ्या कुटुंबातील केवळ 1 विवाहित आणि 1 अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. या बाबी प्रमाणित करून Submit बटण दाबल्यानंतर “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल.


About Author

Rohit Shinde

Other Latest News