MP Breaking News
Sat, Dec 13, 2025

lalbaugcha raja 2025 first look : ‘सोन्याने मढवलेला माझा राजा’; लालबागच्या राजाचं पहिलं मुखदर्शन, पाहा व्हिडिओ

Written by:Smita Gangurde
lalbaugcha raja 2025 : नवसाला पावणारा लालबागच्या राजाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे.

lalbaugcha raja 2025 first look : नवसाला पावणारा लालबागच्या राजाचा पहिला व्हिडिओ समोर आला आहे. सोन्याच्या मखरात अन् सोन्याने मढवलेलं राजाचं भव्य रुप पाहून आपोआप हात जोडले जातील. येत्या दोन दिवसात गणेश चतुर्थी आहे. त्यापूर्वी लालबाग सार्वजनिक मित्र मंडळाकडून दरवर्षीप्रमाणे यंदाही लालबागच्या राजाचा पहिलं मुखदर्शन उपलब्ध करून देण्यात आलं. यावेळी मोठ्या संख्येने गणेश भक्त आणि मीडिया उपस्थित होता. 27 ऑगस्टपासून गणेशाचं (Ganesh Chaturthi 2025) आगमन होणार आहे. त्यामुळे लोकांमध्ये उत्साहाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

सोन्याने मढवलेला माझा राजा… lalbaugcha raja 2025 Video

यंदा लालबागच्या राजाच्या सजावटीवर सोनेरी रंगाची छटा पाहायला मिळत आहे. राजाने सोनेरी रंगाची बुट्टी असलेले लाल रंगाचं धोतर नेसलं आहे. मागे सोनेरी रंगाची सजावटीची भिंत आहे. त्यावर सुंदर असं कोरीव काम करण्यात आलं आहे. राजाच्या उजव्या हाताशी चांदीची गदा आहे. राजाच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक पाहायला मिळत आहे.

देशभरात राजाचे भक्त..

लालबागचा राजा हा केवळ मुंबईपुरता सीमित नसून बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी देशभरातून भाविक येत असतात. राजाकडे आलेला कधी रिकाम्या हाताने जात नाही असं म्हणतात. तो तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण करतो, अशी गणेश भक्तांची मान्यता आहे. त्यामुळे दरवर्षी गणेशोत्सवाच्या दहा दिवसात लाखोंच्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. यामध्ये बॉलिवूड स्टार आणि उद्योगपतींचाही समावेश आहे.