महाराष्ट्रातील सोयाबीन उत्पादकांच्या अडचणी चांगल्याचा वाढत आहेत. कारण बाजार समित्यांमध्ये सध्या सोयाबीनचे आवक नियमित नसल्याने कधी माल जास्त येतो तर कधी कमी, यामुळे बाजारभावामध्ये कमालीची अस्थिरता सध्या पाहायला मिळत आहे. काही ठिकाणी 7 हजारांच्या पार पोहोचलेला दर आता 5 हजारांच्या आत आल्याचे दिसते. परिणामी शेतकऱ्यांमध्ये सध्या कमालीची चिंता पाहायला मिळत आहे.

सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची अस्थिरता

राज्यातील विविध बाजार समित्यांमध्ये 16 आणि 17 नोव्हेंबर 2025 रोजी सोयाबीनची आवक आणि बाजारभावात मोठ्या प्रमाणात चढ-उतार पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी आवक कमी असून भावात अस्थिरता दिसत आहे. काही बाजारांमध्ये सोयाबीनचे दर 4600 रुपयांपर्यंत गेले तर काही ठिकाणी केवळ 1000 ते 1500 रुपये प्रतिक्विंटल इतके कमी दर नोंदवले गेले.

पैठण बाजारात फक्त 4 क्विंटल आवक झाली. येथे सर्वच सोयाबीन 3900 रुपयांना विकले गेले. कमी आवक असल्यामुळे दरात कोणताही फरक पडला नाही. शेवगाव येथे 50 क्विंटल आवक झाली. किमान दर 3800 आणि कमाल 4100 रुपये नोंदवले गेले. सर्वसाधारण दरही 4100 रुपये असल्याने शेतकऱ्यांना समाधानकारक भाव मिळाल्याचे दिसते.

बुलढाणा आणि बुलढाणा-धड या दोन्ही बाजारांमध्ये उत्तम भाव मिळाले. बुलढाणामध्ये आवक 700 क्विंटल, किमान 40000 आणि कमाल 4600 रुपये. सर्वसाधारण दर 4200 रुपये. तर दुसरीकडे बुलढाणा-धड मध्ये आवक 240 क्विंटल, किमान 3700, कमाल 4500 , सरासरी रुपये. येथील दर चांगले असल्यामुळे शेतकरी समाधानी आहेत.

सोयाबीनच्या दरात अस्थिरता नेमकी कशामुळे?

महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात अलीकडे कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भिजला असून त्यामुळे उत्पादनाची प्रत ढासळली आहे. खराब गुणवत्तेमुळे बाजार समित्यांत दर घसरत आहेत. त्यातच बाजारपेठांमध्ये होणारी अस्थिर आवक आणि व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद यामुळे भावात चढ-उतार वाढले आहेत. काही दिवशी आवक जास्त असल्याने दर कमी होतात, तर आवक घटली की अचानक वाढतात. या अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून स्थिर दर मिळण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आणि खरेदी धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.