“एका भाजप आमदाराकडून माझ्या जीवाला धोका”, असीम सरोदेंचा दावा; ‘तो’ आमदार नेमका कोण?

Rohit Shinde

बीड जिल्हा मागील काही दिवसांपासून सतत चर्चेत आहे. त्यामध्येच राम खाडे यांनी सुरेश धस यांचे 1000 कोटींची जमीन हडपल्याचे प्रकरण काढले. हे प्रकरण माझ्याकडे होतं मी काही दिवसांपूर्वीच राम खाडे याला काळजी घ्या सांगितलं होते. त्यानंतर राम खाडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला. सुरेश धस यांच्याकडून माझ्या जीवाला देखील धोका असल्याचा खळबळजनक खुलासा वकील असीम सरोदे यांनी केला आहे. राम खाडे यांच्यावर हल्ल्या झाल्यानंतर राम खाडे यांच्या जवळच्या लोकांकडून भाजपा आमदार सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आला.

सुरेश धसांकडून माझ्या जीवाला धोका -सरोदे

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे बीडमधील कार्यकर्ते राम खाडे यांच्यावर काही दिवसांपूर्वी अहिल्यानगर जिल्ह्यात जीवघेणा हल्ला झाला होता. त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राम खाडे यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती रुग्णालयाकडून देण्यात आली आहे. राम खाडे यांच्यावरील हा हल्ला करण्यामागे भाजप आमदार सुरेश धस यांचा हात असल्याचा आरोप खाडे यांचे सहकारी मनोज चौधरी यांनी केला आहे. मनोज चौधरी यांच्यानंतर आता कायदेतज्ञ असीम सरोदे यांनीही सुरेश धस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

तर, राम खाडे याच्याशी माझं 15 दिवसांपूर्वी बोलण झालं होतं, त्यांना सांगितलं होतं जीवाला जपून काम कर. ते म्हणाले होते माझ्यासोबत लोक असतात. मी जपून काम करत आहे. तरी देखील राम खाडे यांच्यावर हल्ला झाला आहे अत्यंत दुर्दैवी आहे. या हल्ल्याची विशेष चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाई करण्याची मागणी असीम सरोदे यांनी केली आहे.

ते 1000 कोटींचं प्रकरण नेमकं काय ?

राम खाडे यांनी माहितीच्या अधिकारात याबद्दलची बरीच मोठी माहिती काढली होती. बीडमधील हे सर्व प्रकरण आहे. मुख्यत: देवस्थानाच्या जमीन हडप करणे ते देखील भाजपाच्या एका आमदाराने हे फार गंभीर प्रकरण म्हणून पुढे आलेले होते. त्यावेळी पोलिसांकडे तक्रारी करूनही ते दखल घेत नसल्याने राम खाडे यांच्या मार्फत आम्ही मुंबईच्या ईडी ऑफिसमध्ये तक्रार केली होती. त्याच्यासोबत माझ्या माहितीप्रमाणे एक दोनसे ते तीनसे कागदपत्रे लावली होती.

असीम सरोदे यांनी म्हटले की, धडधडीत पुरावा दिसत होता की, 1000 कोटींच्या वर जमीनींच घोटाळा सुरेश धस यांनी केला आहे. आता सुरेश धस यांच्याकडून माझ्याही जीवाला धोका असल्याचे असीम सरोदे यांनी म्हटले आहे. आता देवस्थानांची जमीन हडप करण्याच्या प्रकरणामध्ये भाजपा आमदार सुरेश धस यांच्या अडचणीत अत्यंत मोठी वाढ झाल्याचे दिसतंय. भाजपाकडून या प्रकरणात काय भूमिका घेतली जाते हे देखील पाहण्यासारखे ठरेल.

ताज्या बातम्या